यवतमाळ : गत २४ तासात २३ मृत्युसह जिल्ह्यात ९५३ जण नव्याने पॉझिटिव्ह आले आहेत. तर वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड, विविध कोविड केअर सेंटर आणि कोविड हेल्थ सेंटरमध्ये भरती असलेल्या ४५१ जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार मृत झालेल्या व्यक्तिंमध्ये यवतमाळ येथील ७0, ७0, ६२, ७८ वर्षीय पुरुष व ४0, ५६, ६८, ७६ वर्षीय महिला, यवतमाळ तालुक्यातील ५२, ६0, ६५ वर्षीय महिला, पुसद येथील ५३ वर्षीय पुरुष, पुसद तालुक्यातील ६0 व ७५ वर्षीय पुरुष, वणी येथील ७0 वर्षीय पुरुष व ७५ वर्षीय महिला, उमरखेड तालुक्यातील ५२ व ५७ वर्षीय पुरुष, कळंब तालुक्यातील ६५ वर्षीय पुरुष, मारेगाव येथील ५८ वर्षीय पुरुष, दिग्रस येथील ६0 वर्षीय पुरुष, नागपूर तालुक्यातील ६५ वर्षीय पुरुष आणि हतगाव (जि. नांदेड) येथील ५३ वर्षीय महिलेचा समावेश आहे. मंगळवारी पॉझिटिव्ह आलेल्या ९५३ जणांमध्ये ६00 पुरुष आणि ३५३ महिला आहेत. यात यवतमाळ येथील ३९६ पॉझिटिव्ह रुग्ण, पुसद १६८, उमरखेड ८३, पांढरकवडा ४९, आर्णी ४३, दिग्रस ३८, दारव्हा ३५, नेर २९, महागाव २२, घाटंजी २0, वणी १९, बाभुळगाव १५, मारेगाव १५, झरी १0, राळेगाव ४, कळंब ३ आणि इतर शहरातील ४ रुग्ण आहे. मंगळवारी एकूण ४२३२ रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी ९५३ जण नव्याने पॉझिटिव्ह आले तर ३२७९ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात ३७८६ अँक्टीव्ह पॉझिटिव्ह असून यापैकी रुग्णालयात भरती २0५१ तर गृह विलगीकरणात १७३५ रुग्ण आहेत. तसेच आतापयर्ंत एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ३५५९१ झाली आहे. २४ तासात ४५१ जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या ३१0२३ आहे. तर जिल्ह्यात एकूण ७८२ मृत्युची नोंद आहे. सद्यस्थितीत जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी दर ११.१२ असून मृत्युदर २.२0 आहे.
Related Stories
December 2, 2023