अमरावती : जिल्ह्यातील 14 रेतीघाटांच्या लिलावास जिल्हाधिकारी कार्यालयातील खनिकर्म शाखेतर्फे 15 जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.यापूर्वी 22 डिसेंबर 2020 ते 5 जानेवारी 2021 या कालावधीत 15 रेतीघाटांसाठी निविदा मागविण्यात आल्या होत्या. त्यातील मौजे उंबरखेडा येथील रेतीघाटाबाबत तीनहून अधिक निविदा प्राप्त झाल्या. त्यामुळे त्याला मुदतवाढ देण्यात आलेली नाही. उर्वरित 14 घाटांच्या लिलावाला मुदतवाढ देण्यात आली आहे.
घाटांबाबतची माहिती, निविदेचा तपशील https://amravatico.abcprocure.com या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात येत आहे. रेतीघाटासंबंधीची विस्तृत माहिती या संकेतस्थळासह amravati.nic.in वर व जिल्हा, तहसील कार्यालयांतही उपलब्ध राहील. लिलावात भाग घेण्यासाठी यापूर्वी नोंदणी केलेल्या निविदाधारकांना पुन्हा नोंदणीची गरज नाही. मात्र, नव्याने प्रक्रियेत भाग घेणा-यांना नोंदणी व डिजीटल प्रमाणपत्र काढणे आवश्यक आहे. ज्या निविदाधारकांनी यापूर्वी निविदा भरल्या असल्यास त्यांना ई- ऑक्शनमध्ये भाग घेता येईल. ई- निविदाधारक, तसेच लिलावधारकाकडे पॅनकार्ड, जीएसटीएन कार्ड, आधारकार्ड, मागील दोन वर्षांचे प्राप्तीकर रिटर्न असणे आवश्यक आहे.
या कार्यक्रमानुसार बीडर ऑनलाईन रजिस्ट्रेशन व निविदाधारकाने ऑनलाईन निविदा भरणे नऊ तारखेला सुरू होईल. निविदाधारकांचे ऑनलाईन रजिस्ट्रेशन 11 जानेवारीला सायंकाळी पाच वाजता बंद होईल. ई- निविदा ऑनलाईन पद्धतीने स्वीकारणे 13 जानेवारीला सायंकाळी पाच वाजता बंद होईल. ईएमडीची रक्कम दि. 13 जानेवारीला सायंकाळी पाचपर्यंत जमा करणे अपेक्षित आहे. त्यानंतर जमा केलेल्या ईएमडीच्या रकमेबाबत विलंब झाल्यास त्याची जबाबदारी निविदाधारकाची राहील. ई- ऑक्शन (ई-लिलाव) 15 जानेवारीला सकाळी 11 ते 12 पर्यंत गट क्रमांक 1 ते 5 (संयुक्त रेतीस्थळाचे ई- लिलाव- रेतीघाटाचा एक गट) असा होईल व दुपारी 1 ते 2 दरम्यान गट क्रमांक 6 ते 21 (पृथक वाळूघाट) असा होईल. 15 जानेवारीला दुपारी चार वाजता ऑनलाईन प्राप्त ई- निविदा दुपारी चारला जिल्हाधिकारी कार्यालयात डाऊनलोड करून उघडण्यात येतील. ई- निविदा व ऑक्शन यात जी किंमत अधिक असेल त्यास लिलाव मंजूर करण्यात येईल.
Related Stories
December 4, 2023
December 4, 2023