- गौरव प्रकाशन वृत्तसंकलन
अमरावती (प्रतिनिधी) : जिल्हा लोकशाही दिन महिन्याच्या पहिल्या सोमवारी आयोजित करण्यात येतो. त्यानुसार जुलै महिन्यातील जिल्हा लोकशाही दिन, सोमवार, दिनांक 4 जुलै 2022 रोजी दुपारी 1 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आला आहे. संबंधितांनी याची नोंद घेण्याचे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी यांनी केले आहे.
- (Images Credit : Prahar Digital)