अमरावती : जिल्ह्यातील सर्व अपिलीय, दिवाणी व फौजदारी न्यायालये दि. 13 नोव्हेंबरला शनिवारी सुरू राहतील. तसा आदेश प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश रवींद्र एम. जोशी यांनी जारी केला.
कोविड साथीच्या प्रादुर्भावामुळे 10 जुलैला सर्व अपीलीय व दिवाणी आणि फौजदारी न्यायालयांचे कामकाज बंद ठेवण्यात आले होते. त्याची भरपाई म्हणून दि. 13 नोव्हेंबर 2021 रोजी अमरावती जिल्ह्यातील सर्व अपिलीय, तसेच दिवाणी व फौजदारी न्यायालयांचे कामकाज सुरू राहणार आहे.