- * ‘आयएसी’चे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांचा उद्धव ठाकरेंना सल्ला
मुंबई / पुणे : आजारपणाचे कारणे देवून सहानभूती मिळू शकते परंतु, पक्ष वाढू शकत नाही. पक्ष वाढवण्यासाठी घराबाहेर पडावेच लागते. शिवसेना पक्षप्रमुखांनी त्यामुळे जिल्हानिहाय दौरे करावे अन्यथा पक्ष संपेल,असा सूचक सल्ला इंडिया अगेन्स्ट करप्शनचे (आयएसी) राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांनी शुक्रवारी दिला.आजारापणावर मात करीत राष्ट्रवादी काँग्रेस चे राष्ट्रीय अध्यक्ष मा.शरद पवार साहेबांनी ज्याप्रमाणे पक्षसंघटन मजबूत केले तसेच स्वस्थ न बसता सदैव दौरे केले, वेळप्रसंगी भर पावसात सभा घेतल्याने जनमानसात असलेली त्यांची प्रतिमा आणखी उजळली.यातून उद्धव ठाकरेंनी बोध घ्यावा,असे आवाहन पाटील यांनी केले.महाराष्ट्रात शिवसेना संपवण्यामागे केवळ उद्धव ठाकरेच कारणीभूत आहेत. ठाकरेंची आडमुठी भूमिका, कार्यशैली तसेच कार्यकर्ते-पदहीकाऱ्यांना वेळप्रसंगी न भेटण्याच्या स्वभावामुळे पक्षात बंडखोरी झाली.नाराज आमदारांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात वेगळा गट स्थापन करीत ठाकरेंना सत्तेतून बाहेर केले. शिवसेनेत आता अगदी बोटावर मोजण्याइतकेच नेते शिल्लक राहीले आहेत. त्यामुळे पक्ष वाढवायचा असेल तर विभाग निहाय नवनेतृत्वत पक्षात उभे करावे लागेल, असे मत पाटील यांनी व्यक्त केले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाकडून पक्षावर दावेदारी केली जात आहे. अशात पक्ष वाचवण्यासाठी केवळ कार्यकर्ते राहून चालणार नाही. नेत्यांची ही एक मजबूत फळी शिवसेनेला उभी करावी लागेल.सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित खटल्यांचा निकाला शिंदे गटाचया बाजूने लागला तर शिवसेनेचे भविष्य अधांतरी आहे. त्यामुळे ठाकरे यांनी मरगळ झटकत पक्षाची पुर्नबांधणी करण्यासाठी विभागवार अनुभवी नेत्यांना संधी देण्याची आवश्यकता पाटील यांनी व्यक्त केली. उद्धव ठाकरे यांनी यासाठी त्वरित संघटनात्मक पावले उचलत प्रत्येक जिल्ह्याचा दौरा करावा आणि चांगली नेते नेमावित.
आगामी निवडणुकांसंबंधी देखील ठाकरे यांनी काळजीपूर्वक विचार करावा. गत विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युातीमुळेच पक्षाचे ५४ आमदार निवडून आले होते. पंरतु, यंदा महाविकास आघाडी सरकारसोबत युती केली तर ही संख्या २० ते २२ पर्यंत खाली येईल. खासदार निवडून येण्याची शक्यताही धुसर आहे.केवळ तीन ते चार खासदार सोडले तर शिवसेनेचे इतर खासदार निवडून येण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे संपण्याच्या मार्गावर असलेल्या शिवसेनेच्या या स्थितीला उद्धव ठाकरेच जबाबदार असून त्यांनी यावर तात्काळ पावले उचलली नाहीत तर पक्ष संपेल, असे पाटील म्हणाले.