- गौरव प्रकाशन वृत्त संकलन
अमरावती (प्रतिनिधी) : शासनाच्या निर्देशानुसार जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री सचिवालय कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे. नागरिकांनी मुख्यमंत्री कार्यालयाला द्यावयाचे निवेदन, पत्र या कक्षाकडे दाखल करावीत, असे आवाहन जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी केले आहे.
ग्रामीण भागातील प्रलंबित प्रश्न तातडीने सोडवून परिणामकारक निपटारा करण्यासाठी जिल्हास्तरावर कक्ष कार्यान्वित करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. या कक्षामुळे नागरिकांच्या निवेदनांवर तत्काळ कार्यवाही होऊन, प्रशासनात लोकाभिमुखता, पारदर्शकता व गतिमानता निर्माण होणार आहे.
जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजनभवनाच्या इमारतीत जिल्हा पुरवठा कार्यालयाच्या बाजूला हा कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे. नागरिकांनी मुख्यमंत्री कार्यालयाला द्यावयाची निवेदने या कक्षात दाखल करण्याचे आवाहन जिल्हाधिका-यांनी केले आहे.
- ————–
तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? आम्हास आपल्या परिसरातील बातम्या, लेख अवश्य पाठवा आणि प्रतिनिधी बना ! ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Gaurav Prakashan फेसबुकपेज !
- ——————–
आम्ही तुमच्यासमोर बातम्या, कथा, कविता, वाचनीय लेख अश्या खूप साऱ्या लेखामार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा, कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते, तसेच आमचे फेसबुक पेज ही नक्की लाईक करा, गौरव प्रकाशन युट्यूब चॅनेल लाईक Subscribe करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याचबरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद…!
- -बंडूकुमार धवणे
- संपादक गौरव प्रकाशन
- ——————–