अमरावती : जिल्ह्य़ात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या अनियंत्रीत झाल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे. १७ फेब्रुवारी रोजी जिल्ह्य़ात ४९८ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद करण्यात आली असून जिल्हयात आतापर्यत २६ हजार ७२३ कोरोनाग्रस्त आढळून आले आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोबाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असून दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची विक्रमी नोंदणी केली जात आहे. विशेष म्हणजे १७ फेब्रुवारी रोजी ६ कोरोनाग्रस्त रूग्णांचा मृत्यू झाला असून आतापर्यत एकूण ४४८ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. २४ हजार ४१९ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला असून १ हजार ५00 पेक्षा जास्त रुग्णांवर उपचार सुरू आहे.
मागिल १५ दिवसापासून कोरोना पॉझिटिव्ह रुग्णामध्ये विक्रमी वाढ होत असल्यामुळे प्रशासनाकडून सतर्कता तसेच सुरक्षित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मात्र तरीही कोरोना बाधितांची संख्या आटोक्यात येत नसल्यामुळे प्रशासनाने कडक कारवाई करण्यास सुरुवात केल्याचे दिसून येत आहे. मंगल कार्यालयासह इतर ठिकाणी आयोजित लग्न समारंभ व कार्यक्रमामध्ये ५0 पेक्षा जास्त नागरिकांच्या उपस्थितीवर बंदी घालण्यात आली असून अधिक उपस्थिती दिसल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. मास्क न लावणे, सोशल डिस्टन्सिंग न पाळने अशा नियमांचे पालन न केल्यात दंड तसेच गुन्हा दाखल करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले आहे. जिल्ह्य़ात सातत्याने वाढत असलेल्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णामुळे जिल्हा प्रशासनासह नागरिक सुध्दा त्रस्त झाल्याचे दिसून येत आहे.
काही दिवसांपूर्वी जिल्हयात कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली ही जिल्हावासीयांसाठी शुभवार्ता असली तरी कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची सातत्याने वाढत असलेली संख्या ही नागरिकांसाठी चिंतनिय बाब आहे. प्रशासनाने आखून दिलेल्या नियमांचे नागरिकांकडून सातत्याने उल्लंधन होत असल्यामुळे कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचे चित्र सध्यातरी दिसून येत आहे. १७ फेब्रुवारी रोजी जिल्हयात ४९८ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद करण्यात आली असून जिल्ह्य़ात आतापर्यत २६ हजार ७२३ कोरोनाग्रस्त आढळून आले आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोबाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असून दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची विक्रमी नोंदणी केली जात आहे. विशेष म्हणजे १७ फेब्रुवारी रोजी ६ कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यू झाला असून आतापर्यत एकूण ४४८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. २४ हजार ४१९ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला असून १ हजार ५00 पेक्षा जास्त रुग्णांवर उपचार सुरू आहे.
Related Stories
October 10, 2024