मोर्शी : येथील विदर्भ समाजकल्याण बहुउद्देशीय शिक्षण संस्था ,येरला, ता.मोर्शी द्वारा संचालित जिजामाता माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्री जयंती मा.श्री सुहासराव ठाकरे (अध्यक्ष ,विदर्भ समाज कल्याण बहुउद्देशीय शिक्षण संस्था, येरला)यांच्या अध्यक्षतेत संपन्न झाली.प्रमुख पाहुणे मा.श्री एस. एन .राऊत (कोषाध्यक्ष ,विदर्भ समाजकल्याण बहुउद्देशीय शिक्षण संस्था,येरला) व प्राचार्या श्रीमती एम.डी. मुळे होत्या.
कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.श्री सुहासराव ठाकरे व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्री यांच्या प्रतिमेचे पूजन व हारार्पण करुन अभिवादन करण्यात आले.अध्यक्षीय भाषणातून मा.श्री सुहासराव ठाकरे यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्री यांच्या विचारांची गरज असल्याचे प्रतिपादन केले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे मा.श्री एस.एन .राऊत तसेच प्रा.आर.जी.कोटांगळे,श्री जे.एस.सराटकर, कु.के.एस.काळबांडे मँडम यांनी मनोगतातून अभिवादन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्या श्रीमती एम.डी. मुळे मँडम यांनी केले. संचालन कु.व्ही. ई.कानबाले मँडम तर आभार प्रा .कु.यु.बी. ढोकणे मँडमनी मानले. कार्यक्रमाला श्री एस.पी. ठाकरे ,श्री एस.व्ही.सवाई ,कु.जे.पी. पद्मने मँडम,कु.एस.एन. अर्डक मँडम, कु.एस.वाय.अजमिरे मँडम,कु.एस.जी.गाडगे मँडम, कु.विरखरे मँडम,प्रा. डी.बी.जावळे ,श्री केचे सर,श्री राजू पाटील,श्री तंतरपाळे,श्री गोमकाळे,श्री चौधरी उपस्थित होते.कार्यक्रमाची सांगता वंदेमातरमने झाली.
(Images Credit :Medium.com, Naiduniya.com)