काय हररोजच येतं
संद्याकाय झाली का
जू खांद्यावर घेतं !
किती सोसाव पिकानं
पयाटीचे बोंडं सळून रायले
रोज कायजात धळकी भरते
सोयाबीन आली ना काळाले
काय राज्या पान्या भौ
असंई कुठं असते काय ?
खाली गेलं मुंडकं पिकाचं
अन वरतून तू देतं पाय !
काल सोयाबीनले भाव होते
अज गप्पकन खाली उतरले
वरतून तू मारतं खाली हे मारते
अशा वक्ताले सांगाव कोनाले ?
– अरुण विघ्ने
चित्र सौजन्य : विशाल शेंडे आणि