अमरावती : जात पडताळणी तत्काळ होऊन संबंधितांना प्रमाणपत्र प्राप्त होण्यासाठी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीतर्फे 30 मार्चपर्यंत विशेष मोहिम हाती घेण्यात आली आहे, अशी माहिती उपायुक्त सुनील वारे यांनी दिली.
शैक्षणिक, तसेच विविध सेवा, निवडणूक व इतर कारणांसाठी जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य असते. अर्जदारांचे नुकसान होऊ नये म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेने जिल्हा समित्यांना विशेष मोहिम राबविण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार अमरावती जिल्हा समितीकडून मोहिम सुरू केली आहे.
समितीने संबंधित अर्जदारांना त्यांच्या प्रकरणातील त्रुटीची पूर्तता करून घेण्याविषयी सूचना भ्रमणध्वनीद्वारे देण्यात आल्या आहेत. ज्या अर्जदारांनी ऑक्टोबर 2020 पूर्वी अर्ज केले आहेत, तथापि वैधता प्रमाणपत्र मिळालेले नाही. त्यांनी समितीकडे आवश्यक पुरावे व मूळ कागदपत्रांसह संपर्क साधण्याचे आवाहन उपायुक्तांनी केले आहे.
Related Stories
September 17, 2024
September 14, 2024