हिवाळा म्हटला की, सर्दी, खोकला अशा ठराविक आजारांचाच विचार केला जातो. परंतु या दिवसात विविध प्रकारच्या अँलर्जीचा त्रासही डोकं वर काढत असतो. या दिवसात वातावरणात धुलीकणांचं प्रमाण बरंच वाढलेलं असतं. त्यामुळेही संसर्ग संभवतो. सर्दी आणि अँलर्जी यात फरक असतो. सर्वसाधारण सर्दी जास्तीतजास्त १0 दिवस टिकते तर अँलर्जी अनेक आठवडे किंवा महिनेही टिकून राहू शकते. या अँलर्जीविषयी जाणून घेऊ..
धुलीकण, फुलांमधले परागकण, बुरशी, धूळ, पाळीव प्राण्यांचे केस, अत्तर, परफ्युम्समुळे या दिवसात अँलर्जी होऊ शकते. सतत वाहणारं नाक, शिंका येणं, श्वास घेताना सू-सू असा आवाज येणं, डोळ्यातून पाणी येणं, नाकात आणि घशात खवखवल्यासारखं वाटणं, कफ साचून राहणं ही थंडीतल्या अँलर्जीची लक्षणं आहेत. दम्याचा त्रास असणार्या रुग्णांच्या छातीतून घरघर असा आवाज येणं, छातीत कफ साचणं, श्वास घेताना त्रास होणं अशी लक्षणं दिसून येतात. थंडीतली अँलर्जी आणि सर्दी, फ्लू यात बराच फरक आहे. फ्लू आणि सर्दीत वर नमूद केलेल्या लक्षणांसोबत ताप, वेदना, डोकेदुखी अशी लक्षणंही आढळतात. ही लक्षणं अँलर्जीत दिसून येत नाहीत.
Contents
hide
Related Stories
October 31, 2024
October 19, 2024
September 3, 2024