- गौरव प्रकाशन वृत्तसंकलन
अमरावती (प्रतिनिधी) : जागतिक बालकामगार विरोधी दिनानिमित्त (12 जून) सर्व दुकाने, आस्थापना, कारखाने, हॉटेल्स, ढाबा, गॅरेजेस, वीटभट्टी व इतर आस्थापना मालक संघटना, हॉटेल असोसिएशन, खाद्य पेय विक्री असोसिएशन, किराणा असोसिएशन यांची बैठक आयोजित करण्यात आली. यामध्ये ‘बालकामगार’ या अनिष्ट प्रथेतून अमरावती जिल्हा मुक्त करण्यासाठी जनजागृती करण्यात आली.
बाल व किशोरवयीन कामगार (प्रतिबंध व नियमन) अधिनियम 1986 तसेच सुधारणा 2016 अन्वये 14 वर्षाखालील बालकांना कामावर ठेवल्यास अधिनियमातील तरतुदीनुसार आस्थापना मालकास प्रतिबंध करण्यात आला असून 6 महिने ते 2 वर्षापर्यंत शिक्षेची तरतुद आहे. तसेच सुमारे 20 हजार ते 50 हजार रुपयांपर्यंत दंडाची तरतुदही आहे. यानुसार 18 वर्षाखालील किशोरवयीन कामगारांना सर्व धोकादायक उद्योग व प्रक्रियेमध्ये काम करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे.बाल कामगारांना कामावर ठेवण्यात येऊ नये. तसेच बालकामगार आढळून आल्यास कामगार विभागाच्या 0721-2662115 या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन कामगार उपाआयुक्त सतिश पाटणकर यांनी केले आहे.
- (Images Credit : Tarun Bharat)