- अनादी काळापासून इथल्या
- व्यवस्थेशी आम्ही लढतो आहे
- काल आमचे पुर्वज लढले
- आज बारी आमची आहे ……
- जर का आज लढणे थांबले
- तर आमचे काही खरे नाही
- लाख पिढ्या बर्बाद झाल्या
- पुढील पिढीचेही बरे नाही …..
- आता तुमचे तुम्ही ठरवून घ्या
- नाहीतर आपली जिरवून घ्या
- काळोखावर प्रहार करून
- अशोकचक्र फिरवून घ्या …..
- प्रत्येकजण स्वार्थी झाला
- संविधानाचा लाभार्थी झाला
- तृष्णेच्या आहारी जाऊन
- शञू फौजात भर्ती झाला …..
- संविधान जगवण्यासाठी
- कुणीच रस्त्यावर येत नाही
- विकृत झाल्या व्यवस्थेला
- कुणीच शिंगावर घेत नाही …..
- अस्तित्व आणि आस्मिता
- दोन्ही आज धोक्यात आहे
- विकलांग झाल्यात भावना
- धर्मच हरेकाच्या डोक्यात आहे ….
- स्वातंत्र्य समता न्यायासाठी
- जोवर पेटून उठणार नाही
- प्रश्न आमचे वाढत जातील
- कुणीच यातून सुटणार नाही …..
- शेळी होऊन जगण्यापेक्षा
- मैदानी लढणे बरे आहे
- पण सारे एक होऊन लढलो
- तरच आमचे खरे आहे …..
- आता आपसी द्वंद नको
- माणसं माणसांशी जूळली पाहिजे
- तथागताची सम्यक वाणी
- उरी-ओठी खेळली पाहिजे …..
- -गणेश लांडगे
- ९७६४८६४२७१