Skip to contentगणतंत्र दिन । एका दिवसाचा ।
शान तिरंग्याचा । राखू आम्ही ।।
जागते आमची । त्याच दिनी भक्ती ।
दाखवितो शक्ती । एकतेची ।।
दुसऱ्याच दिनी । भावांमध्ये भेद ।
होतो शिरच्छेद । गरिबांचा ।।
जगणे कठीण । सोयीचे मरणे ।
चोर,लुटारूंना । अभय देतात ।
चित्रात शोभते । फक्त मानवता ।
दुरून पाहता । खरे वाटे ।।
कोण बोलणार । देशासाठी आज ।
पुस्तकात एक । बाहेर वेगळे ।
खोटीच शपथ । खोटी देशसेवा ।
संपत्तीचा हेवा । अनेकांना ।।
भ्रष्टाचार कुठे । थांबतो इथला ।
गरीब मुकला । न्यायासाठी ।।
ढोंग करणारे । महान झालेत ।
कुठे देशभक्ती? । कुठे समानता? ।
व्यसनी राहता । युवापिढी ।।
जागव देशाला । देवा निद्रेतून ।
व्यसनापासून । मुक्त कर ।।
हीच अभिलाषा । असेल सदैव ।
तरनोळी,ता.दारव्हा,जि.यवतमाळ
Post Views: 52
Like this:
Like Loading...