- * गुरू रविदास,छ.शाहू महाराज, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले या महामानवांचे पूर्णाकृती पुतळे बसविण्याची केली मागणी
अमरावती : ” छत्रपती शाहू महाराज हे स्वतःची राजकीय कारकीर्द संपूर्ण बहुजन समाजाला न्याय देण्यात खर्ची घालणारे बहुजन राजे होते म्हणूनच त्यांची जयंती सामाजिक न्याय दिन म्हणून साजरी करण्यात येते.प्राथमिक शिक्षण सक्तिचे करणारे ,जातिभेद व अस्पृश्यता निर्मूलन करणारे, आंतरजातीय विवाहास कायदेशीर मान्यता देणारे, बालविवाहास प्रतिबंध करून नोंदणी विवाहाचा कायदा करणारे, घटस्फोटाला व विधवा पुनर्विवाहाला कायदेशीर मान्यता देणारे,कुटुंबातील स्त्रियांवर होणाऱ्या शारीरिक व मानसिक छळापासून संरक्षण देणारा कायदा मंजूर करणारे, बहुजन समाजाचे दारिद्र्य, अज्ञान, अंधश्रद्धा नष्ट होण्यासाठी शिक्षणाची आवश्यकता प्रतिपादन करून मोफत शिक्षणाची सोय करणारे छत्रपती शाहू महाराज हे बहुजनांचे राजे होते,असे प्रतिपादन प्रा. अरुण बुंदेले यांनी प्रमुख वक्ते पदावरून केले.
स्थानिक छ.शाहू महाराज जयंती निमित्त महात्मा फुले पूर्णाकृती पुतळा चौक येथे प्रपुख वक्ते पदावरून विचार व्यक करीत होते. राजर्षी छ. शाहू महाराज, महात्मा फुले, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांना फुले-शाहू-आंबेडकरी अनुयायांनी अभिवादन केले. सर्वप्रथम महात्मा फुले पुतळा परिसर स्वच्छ करण्यात आला .तत्पूर्वी छ. शाहू महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून वृक्षारोपण कार्यक्रम पार पडला.उपेक्षित समाज महासंघ, कै.मैनाबाई बाबरावजी बुंदेले स्मृती प्रतिष्ठान,फुले-आंबेडकर प्रबोधन मंच, सर्वशाखीय माळी महासंघ,वऱ्हाड विकास,डॉ. बाबासाहेब आंबेडकर दलितमित्र समाजभूषण संघाच्या वतीने नुकत्याच संपन्न झालेल्या राजर्षी छ.शाहू महाराज जयंती पर्वाच्या अध्यक्षस्थानी महासंघाचे अध्यक्ष प्रा.श्रीकृष्ण बनसोड होते.प्रमुख वक्ते प्रा.अरुण बुंदेले (समाजप्रबोधनकर्ते) व कामगार नेते श्री श्रीकृष्णदास माहुरे,मरार माळी बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष श्री रामकुमार खैरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
अध्यक्षीय भाषणातून प्रा. श्रीकृष्ण बनसोड म्हणाले की,राजर्षी शाहू महाराजांनी सामाजिक परिवर्तनाची चळवळ गतिशील केली.अस्पृश्यतेचा कलंक नष्ट व्हावा आणि अस्पृश्यांना स्वाभिमानी व स्वावलंबी जीवन जगता यावे आणि सामाजिक विषमता नष्ट होऊन समताधिष्ठित समाज प्रस्थापित व्हावा म्हणून दलितेतरांना कार्यप्रवण केले.”असे विचार व्यक्त केले. प्रमुख वक्ते प्रा.अरुण बुंदेले यांनी,” छ.शाहू महाराज “या स्वरचित अभंगाचे गायन करून सर्वांना मंगमुग्ध केले.
याप्रसंगी अमरावती शहरांमध्ये महानगरपालिकेने दर्शनी स्थानी श्री संत शिरोमणी गुरु रविदास महाराज, छत्रपती शाहू महाराज, लोकशाहीर आण्णाभाऊ साठे, ज्ञानज्योती सावित्रीबाई जोतीराव फुले या महामानवांचे पूर्णाकृती पुतळे बसविण्याची मागणी करण्यात आली. या कार्यक्रमाला दलितमित्र शालिनीताई मांडवधरे, शकील खान,विजय सोनार, शंकर सदाशिवराव डांगे, गोविंद फसाटे, रियाज खान, शाहरुख खान,सतीश मेहरे, गुणवंत राऊत,सुधीर घुमटकर, प्राचार्य दत्तात्रय गणगणे, प्राचार्य टी. एफ.दहिवाडे, मुन्ना तेलगी, प्राचार्य अब्दुल अजीज रिजवी,रामकुमार खैरे, ओमप्रकाश अंबाडकर,इंजि. भरतराव खासबागे, उद्योजक नंदकिशोर वाघ, सौ. नंदा बनसोड यासह फुले-शाहू-आंबेडकरांचे अनेक अनुयायी उपस्थित होते.