साहित्य: बारीक चिरलेली भोपळी मिरची, बारीक चिरलेला कांदा, ब्रेड, बटर, कोथिंबीर, मीठ, कोथिंबीर पुदिना चटणी, चीझ.
कृती : एका भांड्यात बारीक चिरलेली भोपळी मिरची, बारीक चिरलेला कांदा समप्रमाणात घ्या. त्यात थोडीशी कोथिंबीर, थोडा बटर, चवीनुसार मीठ आणि भरपूर चीझ किसून टाका. हे मिर्शण हाताने चांगले एकजीव करा. दोन ब्रेडच्या एका बाजूला बटर लावून घ्या. त्यावर आवडीनुसार पुदिन्याची चटणी लावा. एका ब्रेडवर वरील मिर्शण ठेवा व त्यावर दुसरा ब्रेड ठेवून दाबा. हे सॅण्डवीच टोस्टरमध्ये ठेवा व चांगले टोस्ट करून घ्या. सर्व्ह करतेवेळी वरून चिझ किसून टाका. टोस्टर नसल्यास तुम्ही गरम तव्यावर थोडा बटर टाकून दोन्ही बाजूने खरपूस भाजून घेऊ शकता. ओरेगानो, हर्ब्सचाही वापर करू शकता.
Related Stories
November 20, 2023
October 27, 2023
October 12, 2023