- गोठ्यात विव्हळते गाय
- घायाळ तिची वासरे
- हतबल झाले हात पाय
- क्षण सुखाचे संपले सारे
- कसा खुपसला सुरा
- माझ्याच वारसाने
- क्षणिक सुखाच्या मागे
- माखलेस हात रक्ताने
- मारेकरी कसा तू
- भावनांचा खून केला
- शस्त्रावीणा गड्या तू
- हल्ला कठोर केला
- माझी मला वाटे लाज
- पीला माझाच पान्हा तू
- सख्खा भाऊ पक्का वैरी
- असा कसा झालास तू
- कुपोषित होता म्हणून
- पोसला तुला प्रेमाने
- वाटेकरी तू असा कसा
- सुख भोगतो एकट्याने
- अंत आता निकट आला
- ठेव लाज या कुसेची
- टाक हत्यार आता
- का घेतो हाय साऱ्यांची
- -सौ. शितल राऊत
- अमरावती
(Images Credit : jagran)