सुंदर मोठंसं घर होतं.त्या घराभोवती बाग होती.हवं तर त्या बागेतून शोभणारी ती अशोकाची झाडं.ती उंच उंच झाडं त्या बंगल्यासमोर शोभून दिसत होती.याच बंगल्यात लिलाधर व नयनतारा हे जोडपे राहात होते.
नयनतारा व लिलाधर दोघंही नोकरीला होते.त्यातच त्यांनी पै पै पैसा जोडून पुष्कळ सारी संपत्ती जोडली होती.त्यांना एकुलता एक मुलगा होता.त्याचं नाव राजेश होतं.तो लाडात वाढलेला होता.त्याला त्याच्या वडीलानं तो एकुलता एक असल्यानं लाडाप्रेमानं वाढवलं होतं.त्याला कमी पडू दिलं नव्हतं.अशातच या राजेशला वाईट सवय लागली.ती म्हणजे काम न करण्याची व इतर अनैतिक गोष्टीचीही.
मुलगा राजेश बिघडलेला.मायबापाला विचार येत होता.कसं करावं.मुलगा सुधारेल कसा? त्यांनी मुलाबद्दल इतरांना सांगून पाहिलं की मुलगा सुधरंवायचा कसा.त्यावर त्यांना कुणीतरी सांगीतलं की या मुलाचा विवाह करुन टाकावा.तो आपोआपच सुधारेल.
मायबापानं मुलाचा विवाह केला.त्यांनी त्यासाठी एक सुंदर साजेशी मुलगी बघीतली.ती मुलगी पाहायला सुंदर होती.व्यतिरिक्त पेशानं डॉक्टरही होती.श्रीमंत घराणं आहे म्हणून तिच्या बापानंही तिचा विवाह राजेशशी करुन दिला.आता संसार सुरु झाला होता.
काही दिवस गेले होते.तसे दिवस जात राहिले.त्यातच तिला दोन मुलंही झाली.ती मुलं लहानाची मोठी होवू लागली.पण जसजसे दिवस जावू लागले.तसतसे राजश्रीला आपल्या पतीच्या खुब्या माहित होवू लागल्या.त्याचं दारु पिणं,त्यातच घरी मुलं मुली आणणं.आपल्या डॉक्टर पत्नीसमोरच त्या मुलींशी अश्लिल चाळे करणं इत्यादी गोष्टीची तिला माहिती होवू लागली.त्यातच दोघांचे खटकेही उडू लागले.पण तरीही ती सहनशील करीत चूप होती.तिला चूप बसणे आवडत नव्हते.पण संसार तुटण्याची भीती तिली वाटत होती.मात्र या गोष्टीची माहिती तिनं आपल्या पतीची बेइज्जत होईल म्हणून आपल्या मायबापांनाही त्या गोष्टी सांगीतल्या नाहीत.पण ती सहन तरी किती करणार.
एकदाचा तो प्रसंग आणि दिवस उजळला.राजश्री बाहेर गेली होती.तशी ती अचानक घरी आली.दरवाजा लावलेला नव्हता.तसं तिनं दरवाजा उघडला आणि आवाज न करता बेडरुममध्ये शिरली.तर पाहते काय,तिचा पती तिच्या बेडरुममध्ये एक माणसासोबत अश्लिल चाळे करीत असलेला दिसला.
राजश्रीनं ते दृश्य पाहिलं.तिला पतीबद्दल वाईट वाटलं.तिला पतीचा भयंकर रागही आला.काय करावं अन् काय नको असं तिला वाटलं व तिनं ताबडतोब निर्णय घेतला.त्याला आता सोडायचं.ताबडतोब आताच्या आता सोडायचं.
राजश्रीनं त्याला सोडायचा घेतलेला निर्णय……..तिनं सर्व सामान भरलं.एका मुलाला कडेवर घेतलं.दुस-या मुलाचं बोट पकडलं व ती आपल्या मायबापाच्या घराचा रस्ता चालू लागली.पण तिला पतीनं अडविलं नाही वा तिची माफी मागीतली नाही.
बरेच दिवस झाले होते.तिला घटस्फोट हवा होता.पण ते पाहिलेले अश्लिल चाळे कोणासमक्ष बोलू शकत नव्हती.तिला त्या गोष्टीची लाज वाटत होती.वडीलांनी तिला सुरुवातीला येण्याचं कारण विचारलं.त्यावर राजश्रीनं सहज आले असं उत्तर दिलं होतं.पण तिला वडील जेव्हा जायला सांगत.तेव्हा मात्र ती ती गोष्ट टाळत होती.एकदा वडीलांनीच तिला दम देवून विचारलं,
“बेटा,मी तुला दररोज विचारतोय की तू आपल्या पतीच्या घरी जा.पण तू का जात नाही? का टाळतेस? असं काय झालं की तू जायला तयार नाही पतीच्या घरी.माझा पारा जर सरकला तर मी तुला जबरदस्तीनं नेवून देईल.”
बापानं असं म्हणताच ती रडायला लागली.तशी तिची आई म्हणाली,”बेटा,काय झालं? मला सांग.जे बापाला सांगता येत नसेल.ते मला सांगू शकतेस.”
तशी ती आपली कर्मकहानी आईला सांगू लागली.आईनं ती कहानी बापाला सांगीतली व बापाला ते ऐकून धक्काच बसला.बापानं ती कहानी ऐकताच ठरवलं आता काहीही झालं तरी मुलीला कोणत्याही परिस्थीतीत तो पतीच्या घरी पाठवणार नाही.आता घटस्फोटच घ्यायचं.असेच दिवसामागून दिवस जात होते.
न्यायालयात खटला दाखल झाला.फैरीवर फैरी झडत राहिल्या.कोणी तिला वाईटही म्हणू लागलं.कोणी तिला चांगलंही म्हणू लागलं.न्यायालयही तिला समजावून सांगू लागलं. ‘ही लहानशी मुलं बघ.याकडं पाहा.यांना पाहून राहा.झालं ते विसरुन जा.अख्खी जिंदगी तुझ्यापुढे आहे.तू कशी कापणार.’ वैगेरे सर्व गोष्टी.पण ती ऐकत नव्हती.त्यातच न्यायालयानं धमकीही दिली की आम्ही मुलं त्याचेकडे देवू.तरीही ती हारली नाही.तिनं हिंमत ढासळू दिली नाही.ती खंबीर होती,एखाद्या स्थितप्रज्ञासारखी. आज घटस्फोट झाला होता.तिला संपत्ती मिळाली नाही.मात्र मुलं मिळाली.त्यातही एक अट होती.ती ही की अठरा वर्ष झाल्यावर मुलांची इच्छा चालेल.ती ज्यांचेकडे राहतो म्हणतील,त्याचेकडे राहायला जावू शकतील.ती लहान असल्यानं आता ती आईकडेच राहतील.घटस्फोटाचा निकाल.ती खुश होती.एरवी असा अश्लिल पती.जो स्री आणि पुरुष भेद मानत नाही.असा पती तिला नको होता.त्या गोष्टी तिनं आईशिवाय कोणालाही सांगीतल्या नाही.न्यायालयालाही नाही.कारण त्याची तिलाच लाज वाटत होती.
समाज राजश्रीला वाईट समजत होता.कारण ज्या गोष्टी तिच्या समोर घडल्या होत्या.त्या गोष्टी तिनं समाजाला सांगीतल्या नव्हत्या.त्या गोष्टी तिनं अंतर्मनात दडवून ठेवल्या होत्या.ती त्या गोष्टी समाजाला सांगूही शकत नव्हती.समाजाला काय माहित होते की तिच्यासोबत काय घडले.आज तिची मुलं मोठी झाली होती.तिनं आपल्या मुलासाठी काबाडकष्ट केले होते नव्हे तर शिकवलं होतं.ती मुलं बापाला विसरली होती नव्हे तर आईची सेवा करीत होती.संस्कारी बनली होती.हे संस्कारी बनणे तिनं पतीला सोडल्याचा परीणाम होता.जर तिनं पतीला सोडलं नसतं तर त्याचे काही औरच परीणाम झाले असते हे मात्र निश्चीत.हे सर्व घटस्फोटानं घडवलं होतं.
- अंकुश शिंगाडे
- नागपूर ९३७३३५९४५०