- गौरव प्रकाशन वृत्त संकलन
अमरावती (प्रतिनिधी) : ग्रामपंचायतींच्या सदस्यपदांसह थेट सरपंचपदाच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी पारंपरिक पद्धतीने (ऑफलाईन) नामनिर्देशनपत्र सादर करण्याची मुभा देण्यात आली आहे. तसेच, नामनिर्देशनपत्र सादर करण्याची मुदत 2 डिसेंबर रोजी सायंकाळी 5.30 पर्यंत वाढविण्यात आली आहे. तसे पत्र राज्य निवडणूक आयोगाकडून जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झाले आहे.
राज्य निवडणूक आयोगाने 9 नोव्हेंबर 2022 रोजी राज्यातील 7 हजार 751 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा केली होती. त्यानुसार दि.28 नोव्हेंबर 2022 ते 2 डिसेंबर (दुपारी 3 वाजेपर्यंत) या कालावधीत संगणक प्रणालीद्वारे नामनिर्देशनत्र सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यात आता अंशत: दुरूस्ती करून नामनिर्देशनपत्र पारंपरिक (ऑफलाईन) पद्धतीने 2 डिसेंबर रोजी सायंकाळी 5.30 पर्यंत सादर करता येतील, अशी माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. नितीन व्यवहारे यांनी दिली.
नामनिर्देशन पत्र व घोषणापत्र यांचे कोरे नमुने इच्छुकांना उपलब्ध असावेत. पारंपारिक पध्दतीने स्वीकारलेले नामनिर्देशनपत्र छाननी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर केवळ वैध नामनिर्देशनपत्र संगणकात भरून घेण्याची तहसीलदारांकडे सोपविण्यात आली आहे. तशा सूचना आयोगाने केल्या आहेत.
- ————–
तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? आम्हास आपल्या परिसरातील बातम्या, लेख अवश्य पाठवा आणि प्रतिनिधी बना ! ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Gaurav Prakashan फेसबुकपेज !
- ——————–
आम्ही तुमच्यासमोर बातम्या, कथा, कविता, वाचनीय लेख अश्या खूप साऱ्या लेखामार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते, तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याचबरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद…!
- -बंडूकुमार धवणे
- संपादक गौरव प्रकाशन
- ——————–