मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने ग्राहकांनी स्वत: मीटर रीडिंग पाठवून तसेच वीज बिल भरून महावितरणला सहकार्य करण्याचे आवाहन राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी केले आहे. वीज ग्राहकांच्या तक्रारी सोडवण्याला प्राधान्य देण्याचे आदेशही यावेळी त्यांनी महावितरण व्यवस्थापनाला दिले आहेत. मंत्रालय येथे वीज बिल व थकबाकी यासंदर्भात बैठक पार पडली.
ग्राहकांना ऑनलाईन व मोबाईल अँपद्वारे तक्रार करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. तरीदेखील जे ग्राहक याचा वापर करू शकत नाही त्यांच्यासाठी स्थानिक कार्यालयात ऑफलाईन तक्रारी नोंद करून घेण्याची व्यवस्था करा, असे निर्देश यावेळी त्यांनी दिले.
राज्यात वीजेचे दर कमी करण्याठी कसोशीने प्रयत्न करण्यात येत असून वीज खरेदी कराराचे पुनरावलोकन करण्यात येणार आहे. वीज खरेदीसाठी पॉवर एक्स्चेंजमधून दररोज साधारणत: ११00 ते १८00 मेगावॅट वीज विकत घेण्यात येते. पॉवर एक्स्चेंजसोबत दरासंबंधी वेळोवेळी वाटाघाटी करून स्वस्त वीज घेण्याचा प्रयत्न करण्याचे, निर्देश ऊर्जामंत्र्यांनी अधिकार्यांना दिले.
थकबाकी वसुलीसाठी गेलेल्या कर्मचार्यांना मारहाण करण्याच्या दुर्दैवी घटना घडत असून त्या खपवून घेतल्या जाणार नाही, असे सांगत नितीन राऊत यांनी महावितरण व प्रशासन हे कर्मचार्यांच्या पाठीशी असल्याचे सांगितले.
Related Stories
October 10, 2024
October 9, 2024