अमरावती : जिल्ह्यातील ५३७ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी मतदान शुक्रवारी झाले. त्याची मतमोजणी आज सोमवार, दि.१८ जानेवारीला तालुक्याच्या ठिकाणी होणार आहे. त्यासाठी प्रशासनाकडून संपूर्ण तयारी करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी शैलेश नवाल यांनी दिली.
मतमोजणीच्या ठिकाणी व मतमोजणी वेळी उमेदवार व त्यांच्या कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता असते. त्यामुळे क्षुल्लक कारणांवरुन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन मतमोजणीच्या कामात अडथळा निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासाठी जिल्हादंडाधिकारी शैलेश नवाल यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ च्या कलम अन्वये ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूकीच्या मतमोजणी केंद्राच्या १00 मीटर परिसरात १८ जानेवारीच्या सकाळी ६ वाजतापासून ते मतमोजणी संपेपयर्ंत प्रतिबंधात्मक आदेश जारी केला आहे. उमेदवार किंवा उमेदवारांचे प्रतिनिधी, मतमोजणी अधिकारी-कर्मचारी यांच्या व्यतिरिक्त मतमोजणी स्थळाच्या १00 मीटर परिसराच्या आत प्रवेश देण्यात येणार नाही. तसेच या ठिकाणी निवडणूक निर्णय अधिकारीय यांनी उमेदवारांना किंवा त्यांच्या प्रतिनिधींना अधिकृत पास दाखविल्याशिवाय प्रवेश देऊ नये. मतमोजणीच्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे झेरॉक्स, फॅक्स मशीन, ई-मेल, इतर संपर्क साधनांच्या गैरवापरावर प्रतिबंध करण्यात आले आहे. तसेच मतमोजणीच्या ठिकाणच्या १00 मीटर परिसरामध्ये मोबाईल फोन, वायरलेस सेट, ट्रान्झिस्टर, कॅल्क्यूलेटर इत्यादी प्रकारच्या वापरावर प्रतिबंध घालण्यात आला आहे.या आदेशाचा भंग करणार्या व्यक्ती विरुध्द भारतीय दंड संहिता १८६0 च्या कलम १८८ अन्वये शिक्षापात्र असलेला अपराध केला असे मानून संबंधितांवर कारवाई करण्यात येईल. हा आदेश मतमोजणी केंद्राच्या ठिकाणी दि. १८ जानेवारी सकाळी ८ वाजेपासून तर मतमोजणी प्रक्रिया संपेपयर्ंत लागू राहील.
Related Stories
December 4, 2023
December 4, 2023