- गौरव प्रकाशन वृत्त संकलन
अमरावती (प्रतिनिधी) :राज्य निवडणूक आयोगाकडून अमरावती जिल्ह्यातील एकूण 14 तालुक्यातील 257 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. यासाठी मतदान रविवार, दि. 18 डिसेंबर 2022 रोजी सकाळी 7.30 वाजता ते सायंकाळी 5.30 पर्यंत होणार आहे. तसेच 20 डिसेंबर रोजी तालुकानिहाय तहसील कार्यालय येथे मतमोजणी व दि. 23 डिसेंबर रोजी ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2022 चा निकाल प्रसिध्द करण्यात येईल. या अनुषंगाने निवडणूक खुल्या, मुक्त व निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्याच्यादृष्टीने मतदानाचा आगोदरचा दिवस (17 डिसेंबर), मतदानाचा दिवस (18 डिसेंबर) व मतमोजणीचा दिवस (20 डिसेंबर) या दिवशी महाराष्ट्र दारुबंदी कायदा 1949 चे कलम 142 (1) अन्वये मद्यविक्री करण्यास मनाई करण्यात आली असून कोरडा दिवस जाहीर केला आहे. उपरोक्त कालावधीत जिल्ह्यातील सर्व तालुक्याच्या ठिकाणी मतमोजणी प्रक्रिया संपेपर्यंत दारुबंदी राहील, असे आदेश जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी जारी केले आहे.
मतमोजणीच्या ठिकाणच्या नगरपालिका व नगरपरिषद क्षेत्रातील सर्व कार्यरत अबकारी अनुज्ञप्त्या, दुकाने मतमोजणी कार्यक्रम संपेपर्यंतच्या कालावधीसाठी बंद ठेवण्याचे आदेश निर्गमित केले आहे. या आदेशाचे उल्लंघन करुन मद्यविक्री केल्याचे आढळून आल्यास संबंधिताविरुध्द कार्यवाही करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी निर्देश दिले आहे.
- ————–
तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? आम्हास आपल्या परिसरातील बातम्या, लेख अवश्य पाठवा आणि प्रतिनिधी बना ! ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Gaurav Prakashan फेसबुकपेज !
- ——————–
आम्ही तुमच्यासमोर बातम्या, कथा, कविता, वाचनीय लेख अश्या खूप साऱ्या लेखामार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते, तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याचबरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद…!
- -बंडूकुमार धवणे
- संपादक गौरव प्रकाशन
- ——————–