अमरावती : ग्रामपंचायतीच्या निवडणूकीसाठी 15 जानेवारीला सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान होणार आहे. जिल्ह्यात यंत्रणा सुसज्ज करण्यात आली आहे. निवडणूकीसाठी सुमारे 11 हजार मनुष्यबळ तैनात करण्यात आले असून, कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर सर्व दक्षता सूचना देण्यात आल्याची माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी वर्षा पवार यांनी दिली.मतदानापूर्वीचा एक दिवस अर्थात 14 जानेवारीला तालुकास्तरावरून मतदान पथके मतदान यंत्रणेसह मतदान केंद्राकडे रवाना होतील.
- मतदार व केंद्रे संख्या
जिल्ह्यात 553 ग्रामपंचायतीसाठी निवडणूक जाहीर करण्यात आली. त्यानुसार 13 ग्रामपंचायती या बिनविरोध झाल्या व तीन ग्रामपंचायतींत एकूण जागांपैकी काही जागांसाठी वैध नामनिर्देशन पत्र प्राप्त न झाल्याने, तसेच तेथील उर्वरित जागा बिनविरोध झाल्याने निवडणूक होणार नाही. उर्वरित 537 ग्रामपंचायतीच्या 4 हजार 397 सदस्य पदांसाठी निवडणूक होईल. या निवडणूकीसाठी 1948 मतदान केंद्रे असून, पाच लाख सहा हजार 804 महिला, पाच लाख 33 हजार 344 पुरूष व इतर नऊ असे एकूण 10 लाख 40 हजार 159 मतदार आहेत.
अमरावती तालुक्यात 44 ग्रामपंचायतीच्या निवडणूकीसाठी 180 मतदान केंद्रे असून, 45 हजार 585 महिला, 47 हजार 989 पुरूष व तीन इतर असे 93 हजार 577 मतदार आहेत. भातकुली तालुक्यात 35 ग्रामपंचायतीच्या निवडणूकीसाठी 122 मतदान केंद्रे असून, 33 हजार 157 महिला, 34 हजार 795 पुरूष असे मिळून 67 हजार 952 मतदार आहेत. नांदगाव खंडेश्वर तालुक्यात 47 ग्रामपंचायतीच्या निवडणूकीसाठी 144 मतदान केंद्रे असून, 37 हजार 559 महिला, 38 हजार 656 पुरूष असे मिळून 76 हजार 215 मतदार आहेत. दर्यापूर तालुक्यात 50 ग्रामपंचायतीच्या निवडणूकीसाठी 183 मतदान केंद्रे असून, 44हजार 171 महिला, 47 हजार 296 पुरूष व इतर एक असे 91 हजार 468 मतदार आहेत.
अंजनगाव सुर्जी तालुक्यात 34 ग्रामपंचायतीच्या निवडणूकीसाठी 144 मतदान केंद्रे असून, 33 हजार 523 महिला, 36 हजार 157 पुरूष व इतर एक असे 69 हजार 683 मतदार आहेत. तिवसा तालुक्यात 28 ग्रामपंचायतीच्या निवडणूकीसाठी 98 मतदान केंद्रे असून, 32 हजार 571 महिला, 33 हजार 457 पुरूष असे 66 हजार 28 मतदार आहेत. चांदूर रेल्वे तालुक्यात 28 ग्रामपंचायतीच्या निवडणूकीसाठी 92 मतदान केंद्रे असून, 21 हजार 481 महिला, 22 हजार 126 पुरूष असे 43 हजार 607 मतदार आहेत.
धामणगाव रेल्वेमध्ये 53 ग्रामपंचायतीच्या निवडणूकीसाठी 180 मतदान केंद्रे असून, 41 हजार 325 महिला, 43 हजार 193 पुरूष असे 84 हजार 518 मतदार आहेत. अचलपूर तालुक्यात 43 ग्रामपंचायतीसाठी 157 मतदान केंद्रे असून, 41 हजार 635 महिला, 45 हजार 398 पुरूष व इतर एक असे 87 हजार 34 मतदार आहेत. चांदूर बाजार तालुक्यात 40 ग्रामपंचायतीच्या निवडणूकीसाठी 171 मतदान केंद्रे असून, 49 हजार 380 महिला, 53 हजार 240 पुरूष असे 1 लाख 2 हजार 620 मतदार आहेत. मोर्शी तालुक्यात 37 ग्रामपंचायतीच्या निवडणूकीसाठी 145 मतदान केंद्रे असून, 42 हजार 783 महिला, 40 हजार 607 पुरूष असे 83 हजार 390 मतदार आहेत. वरूड तालुक्यात 41 ग्रामपंचायतीच्या निवडणूकीसाठी 155मतदान केंद्रे असून, 42 हजार 29महिला, 45 हजार 480 पुरूष असे 87 हजार 509 मतदार आहेत. धारणी तालुक्यात 35 ग्रा.पं.च्या निवडणूकीसाठी 112 मतदान केंद्रे असून, 28 हजार 29 महिला, 30 हजार 219 पुरूष व इतर दोन असे 58 हजार 250 मतदार आहेत. चिखलदरा तालुक्यात 23 ग्रामपंचायतीच्या निवडणूकीसाठी 65 मतदान केंद्रे असून, 13 हजार 576 महिला, 14 हजार 731 पुरूष व इतर एक असे 28 हजार 308 मतदार आहेत.
- मनुष्यबळ
ग्रामपंचायत निवडणूकीसाठी 2 हजार 177 मतदान केंद्राध्यक्ष, 6 हजार 745 मतदान कर्मचारी व 2 हजार 78 शिपाई असे मनुष्यबळ तैनात आहे.
- मधल्या बोटाला शाई
ज्या क्षेत्रात यापूर्वी कुठलीही निवडणूक नुकतीच पार पडली असेल व डाव्या हाताच्या तर्जनीवरील शाईची निशाणी मिटली नसेल, तिथे मधल्या बोटाला शाई लावण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत.
- कोरोनाबाधितांना मतदान समाप्तीच्या 30 मिनीटांपूर्वी मतदान सुविधा
कोविड-19 बाधित आणि विलगीकरण कक्षातील व्यक्ती; तसेच दोनदा तपासणीनंतरही शरीराचे तापमान विहित निकषांपेक्षा जास्त असलेल्या मतदारांना मतदानाची वेळ संपण्याच्या अर्धा तास आधी प्रतिबंधात्मक उपायांचे काटेकोर पालन करून मतदान करता येईल. कोविड बाधित नसलेले, परंतु प्रतिबंधात्मक क्षेत्रामध्ये वास्तव्यास असलेल्या मतदारांच्या शरीराच्या तापमानाची दोनदा तपासणी केली जाईल. त्यांचे तापमान विहित निकाषांपेक्षा जास्त नसल्यास, अशा मतदारांना सर्वसाधारण मतदारांप्रमाणे सकाळी 7.30 पासून मतदान करता येईल.
- कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर विशेष दक्षता
मतदानाच्या एक दिवस आधी मतदान केंद्राची जागा व साहित्य सॅनिटाईज केले जाईल. प्रत्येक मतदान केंद्राच्या प्रवेशाच्या ठिकाणी थर्मल स्कॅनिंगची व्यवस्था करण्यात येईल. एखाद्या मतदाराच्या शरीराचे तापमान विहित निकषापेक्षा जास्त असल्यास पुन्हा दुसऱ्यांदा तापमान घेतले जाईल. ते कायम असल्याचे आढळल्यास मतदारास टोकन दिले जाईल आणि त्यास मतदान संपण्याच्या अर्धा तास आधी बोलविण्यात येईल. सामाजिक अंतर राखण्याच्यादृष्टीने देखील दक्षता घेण्यात येईल. मतदाराची ओळख पटण्यासाठी मतदारांना आवश्यकतेनुसार फेसमास्क काढावा लागेल. यासह विविध मार्गदर्शक सूचनादेखील यापूर्वीच देण्यात आल्या आहेत.
- मतदानासाठी ओळखपत्राला विविध पर्याय
निवडणूक आयोगाचे मतदार ओळखपत्र नसल्यास इतर पर्यायही उपलब्ध करून देण्यात आले आहेत, असे श्रीमती पवार यांनी सांगितले.
- मतदाराची ओळख पटविण्यासाठी पर्यायी पुरावे
पारपत्र (पासपोर्ट), वाहन चालक परवाना (ड्रायव्हिंग लायसेन्स),आधारकार्ड, पॅनकार्ड, राज्य/केंद्र शासन, सार्वजनिक उपक्रम, सार्वजनिक मर्यादित कंपन्यांचे कर्मचारी असल्यास छायाचित्र असलेले कर्मचारी ओळखपत्र, छायाचित्र असलेले बँकांचे/टपाल कार्यालयाचे पासबुक, मनरेगा जॉबकार्ड, कामगार मंत्रालयाने दिलेले आरोग्य विमा स्मार्टकार्ड, छायाचित्र असलेले निवृत्तीवेतन दस्तावेज, सक्षम प्राधिका-याने दिलेला अपंगत्वाचा दाखला आदी कोणताही एका पुरावा मतदान केंद्रावर घेऊन जाणे आवश्यक आहे.
000