- गोटा कोरता फोडता
- आख्खि जिनगानी गेली
- नाही भेटला रे देव
- नाही भेटली माऊली !!
- गोटा कोरता फोडता
- अंगा घामाचे पाझर
- देवा तुह्या कायजाले
- नाही फुटला पाझर !!
- गोटा कोरता फोडता
- छन्नी हातोड्याचा घाव
- दगड़ात पेरला मी
- माह्या मनीचा रे भाव !!
- गोटा कोरता फोडता
- भेटे पोटाले भाकर
- देवा तुह्या रे मूर्तित
- कुणा भेटली साखर !!
- गोटा कोरता फोडता
- देवा तुह्या जन्म झाला
- जन्मदाता रे कंगाल
- तुच तिरुपति झाला !!
- गोटा कोरता फोडता
- त्यात साकरली मूर्ति
- मूर्ति बैसली मंदिरी
- झाली मूर्तिचिच कीर्ति !!
- गोटा कोरता फोडता
- ऐसा गोटा देव झाला
- पूजा गोट्याची करता
- गोटा माणूसच झाला !!
- वासुदेव महादेवराव खोपडे
- सहा पोलीस उपनिरीक्षक(सेनी)
- अकोला 9923488556
—–