गोंदिया : शहरातील सिंधी कॉलोनी येथील एका नवनिर्माण इमारतीमध्ये दोन मजुरांची झोपेतच निर्घृण हत्या करण्यात आली आहे. ही घटना २५ जून रोजी सकाळी उघडकीस आली. निरंजन हरिचरण भारती (३८) , अमनकुमार नंदलाल भारती (२0) दोन्ही रा.रतनपुरा (उत्तरप्रदेश) अशी मृतांची नावे आहेत. तर बलवान सौरभ जायस्वाल ऊर्फ रॉय (४0) रा.रतनपुरा असे आरोपीचे नाव आहे. घटनेनंतर आरोपी फरार झाला आहे.
शहरातील सिंधी कॉलोनी येथील गोपलानी यांच्या नवीन घराचे बांधकाम सुरू आहे. या कामावर उत्तरप्रदेशातील चार मजूर मागील अनेक महिन्यापासून कामावर आहेत.
दरम्यान, २४ जून रोजी रात्री सर्व मजूर झोपलेले असताना बलवान सौरभ जायस्वाल याने झोपेत असलेल्या निरंजन भारती व अमनकुमार भारती यांची निर्घृण हत्या केली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनस्थळी गाठून पंचनामा केला. तसेच मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी पाठविण्यात आले आहे. घटनास्थळी पोलिस अधीक्षक विश्व पानसरे यांनी पाहणी केली असून, पुढील तपास गोंदिया शहर पोलिस करीत आहे.
Related Stories
November 30, 2023
November 28, 2023