गडचिरोली : दिल्ली आयआयटी येथे दीर्घकाळ गणिताचे प्राध्यापक असलेले तसेच सध्या स्वित्झर्लंड येथे संशोधन अध्यासन पद धारण करीत असलेल्या डॉ. राजेंद्र कुमार शर्मा यांची गडचिरोली गोंडवाना विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यपाल तथा कुलपती भगतसिंह कोश्यारी यांनी डॉ. राजेंद्र कुमार शर्मा यांच्या नियुक्तीची घोषणा केली.
७ सप्टेंबर २0२0 रोजी गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नामदेव कल्याणकर यांचा कार्यकाळ संपल्यापासून कुलगुरूचे पद रिक्त होते. रामटेक येथील कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाचे कुलगुरू प्रो. श्रीनिवास वरखेडी यांच्याकडे सदर पदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला होता. डॉ. राजेंद्र कुमार शर्मा यांनी मेरठ विद्यापीठातून पदव्युत्तर पदवी प्राप्त केली असून आयआयटी दिल्ली येथून पीएच.डी. प्राप्त केली आहे. त्यांनी फ्रान्स व र्जमनी येथे पोस्ट डॉक्टरल शिक्षण प्राप्त केले आहे. डॉ. शर्मा यांनी आयआयटी खडकपूर येथे अध्यापनाला सुरुवात केली व सन २00२ पासून ते दिल्ली आयआयटी येथे प्राध्यापक म्हणून काम करीत आहेत.
१ जानेवारी २0१९ रोजी त्यांची स्वित्झलर्ंड येथे कन्सेनसिस ब्लॉकचेन या संशोधन अध्यासनावर नियुक्ती करण्यात आली. त्यांना अध्यापनाचा ३२ वर्षांचा अनुभव असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली ३२ विद्यार्थ्यांनी पीएच.डी. केली आहे. कुलगुरू निवडीसाठी राज्यपालांनी पाटणा व दिल्ली उच्च न्यायालयाचे सेवानवृत्त मुख्य न्यायमूर्ती न्या. राजेंद्र मेनन यांच्या अध्यक्षतेखाली निवड समिती गठित केली होती.
Related Stories
October 9, 2024