अमरावती, दि. 3 : गृहमंत्री अनिल देशमुख हे उद्या (4 फेब्रुवारी) अमरावती जिल्हा दौ-यावर आहेत.
त्यांचा कार्यक्रम पुढीलप्रमाणे : गुरुवारी सकाळी 7.55 वाजता मुंबईहून रेल्वेने अमरावती रेल्वेस्थानकावर आगमन व शासकीय विश्रामगृहाकडे प्रयाण, सकाळी 8.15 वाजता शासकीय विश्रामगृह येथे आगमन व राखीव, सकाळी 9.30 वाजता पोलीस अधिक्षक कार्यालय येथे कायदा सुव्यवस्थेसंदर्भात बैठक, सकाळी 10 वाजता राष्ट्रवादी काँग्रेस अमरावती शहर जिल्हा कार्यकारिणीची अभियंताभवनात बैठक, अमरावती व बडनेरा विधानसभा मतदारसंघ बैठक, दुपारी 12 वाजता व-हाडे मंगल कार्यालय येथे ग्रामीण जिल्हा कार्यकारिणीची बैठक, दर्यापूर व धामणगाव विधानसभा मतदारसंघ बैठक, दुपारी 2 ते 2.45 राखीव, दुपारी 2.45 वाजता अमरावतीहून परतवाड्याकडे प्रयाण, सायंकाळी 4.15 वाजता परतवाडा येथे आगमन व कृउबास सभागृहात चांदूर बाजार, मेळघाट विधानसभा मतदारसंघ आढावा बैठक, सायंकाळी 6 वाजता परतवाड्याहून मोर्शीकडे प्रयाण, सायंकाळी 7.30 वाजता मोर्शी येथे आगमन व मडके मंगल कार्यालयात मोर्शी विधानसभा मतदारसंघ आढावा बैठक, रात्री 9.30 वाजता मोर्शी येथून वरुड मार्गे नागपूरकडे प्रयाण, रात्री 12.30 वाजता श्रद्धा बंगला, जीपीओ चौक, नागपूर येथे आगमन व मुक्काम.
Related Stories
October 9, 2024