गुडघेदुखीवरचा कायमस्वरूपी उपाय म्हणून अनेकजण गुडघे प्रत्यारोपणाची शस्त्रक्रया करून घेतात. गेल्या काही वर्षांमध्ये ही शस्त्रक्रिया बरीच लोकप्रिय ठरली आहे. गुडघेदुखी, हालचालींवर र्मयादा येण्यासारख्या समस्यांवर गुडघे प्रत्यारोपण हा उत्तम उपाय मानला गेलाय. असं असलं तरी गुडघे प्रत्यारोपण शस्त्रक्रियेचे अनेक धोकेही आहेत. त्यामुळे ही शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्याआधी या धोक्यांवषयी जाणून घेणं गरजेचं ठरतं.
‘ इतर अनेक शस्त्रक्रियांप्रमाणे गुडघे प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रियेसाठी रूग्णाला भूल द्यावी लागते. भूल दिल्यानंतर त्याच्या अंमलाखाली असणं सुरक्षित मानलं जात असली तरी याचे काही दुष्परिणाम असतात. मळमळ, उलट्या, मरगळ, अस्वस्थता, दातांचं नुकसान, स्वरयंत्राचं नुकसान अशा समस्यांसोबतच धमन्यांना दुखापत होण्याची शक्यता असते.
‘ हाडांशी संबंधित शस्त्रक्रियांमध्ये रक्ताच्या गुठळ्या होण्याची शक्यता अनेकपटींनी जास्त असते. शास्त्रीय भाषेत त्याला ‘डीप व्हेन थ्राँबोसस’ आण ‘पल्मोनरी एंबॉलिझम’ असं म्हटलं जातं. पायांमध्ये होणार्या रक्ताच्या गुठळ्यांसाठी ‘डीप व्हेन थ्राँबोसस’ ही संज्ञा वापरली जाते तर फुफ्फुसात होणार्या रक्ताच्या गुठळ्यांना ‘पल्मोनरी एंबॉलझम’ असं म्हटलं जातं. प्रत्येक शस्त्रक्रियेनंतर रक्ताच्या गुठळ्यांचा धोका उद्भवत असला तरी हाडांशी संबंधत शस्त्रक्रियांमध्ये हा धोका अनेकपटींनी वाढतो. शस्त्रक्रियेनंतरच्या दोन आठवड्यांमध्ये रक्ताच्या गुठळ्यांची निर्मिती होऊ लागते. रक्ताच्या या गुठळ्या हृदय, फुफ्फुसापर्यंत पोहचून रूग्णाचा मृत्यू होण्याची शक्यताही असते.
‘ अशा शस्त्रक्रियेनंतर जंतूसंसर्ग होण्याचा धोका असतो. मधुमेहाप्रमाणे ‘र्हेयूमेटॉइड आर्थरायटसम’ध्येही रोगप्रतिकारक क्षमता घटते. रोगप्रतकारक क्षमता घटवणार्या विकाराचा सामना करणार्या रूग्णांमध्ये गुडघे प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रिनेनंतर जंतूसंसर्ग होण्याचा धोका बराच जास्त असतो. शस्त्रक्रिया करून बदलण्यात आलेल्या गुडघ्यालाही जंतूसंसर्गाची लागण होऊ शकते. शस्त्रक्रियेनंतर काही महिन्यांनी किंवा वर्षांनीही ही समस्या निर्माण होऊ शकते.
‘ गुडघे प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया प्रत्येक वेळी यशस्वी होतेच असं नाही. प्रत्यारोपण करून बसवण्यात आलेला गुडघा नीट वाकत नसल्याची किंवा ढीला पडला असल्याची तक्रार बरेच रूग्ण करतात. त्यातही गुडघा ढीला पडल्यास तो पुन्हा नीट बसवता येत नाही. अवयवांच्या प्रत्यारोपणाचा पर्याय म्हणजे एक तडजोड आहे. अशा शस्त्रक्रियांचे लाभ कायमस्वरूपी होत नाहीत, हे लक्षात घेणंही गरजेचं आहे. प्रत्यारोपण केलेले गुडघे शस्त्रक्रियेनंतर अवघ्या काही आठवड्यांमध्ये तुटू शकतात किंवा झजू शकतात. त्यामुळे गुडघेप्रत्यारोपणाचा निर्णय विचारपूर्वक घ्यायला हवा.
Related Stories
September 3, 2024