गुंतवणुकीच्या विविध पर्यायांचा विचार करताना अनेकजण शेअर्सकडे आकर्षित होतात. पण यावेळी मनात शंकाकुशंका असतातच. पैसा बुडेल की काय अशी भीती वाटत राहते. ही भीती घालवण्यासाठी शेअर बाजारातल्या गुंतवणुकचे काही फंडे जाणून घ्या.
चांगल्या कंपनीचे शेअर्स योग्य किंमतीत मिळत असतील तर लगेच विकत घ्या. इतरांच्या पावलावर पाउल टाकू नका. स्वत:चे निर्णय स्वत: घ्या. शेअर्सच्या किंमतीपेक्षा त्याचं मूल्य बघा. अनेकदा ५0 ते १00 रुपये किंमतीच्या शेअर्सचं मूल्य जास्त असू शकतं. शेअर्समध्ये गुंतवणूक करण्याआधी संबंधित कंपनीची कामगिरी बघा. नियमित डिव्हिडंड देणार्या कंपन्यांवर भर द्या. कर्जाचा बोजा कमी असणार्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करा. शेअर्समध्ये एकदम सगळी रक्कम गुंतवू नका. टप्प्याटप्प्याने पुढे जा. वास्तववादी अपेक्षा ठेवा. सुरक्षित गुंतवणूक मानल्या जाणार्या कंपन्यांच्या शेअर्समधून कमी वेळात भरपूर कमाई होऊ शकत नाही. पण दीर्घकालीन गुंतवणूक असेल तर तुम्हाला चांगला परतावा मिळतो. शेअर बाजारातल्या अफवांवर विश्वास ठेवू नका. अधिक परताव्याचा मोह ठेवू नका.
Related Stories
November 20, 2023
October 27, 2023
October 12, 2023