- गावके कलाकार
- नमस्कार मंडळी….
- आज आपल्या गावासाठी अभिमानाची गोष्ट हाय…..
- आपल्या गावाचे अजय अतुल म्हणून प्रसिद्ध असलेले..! व्हॉट्सॲप व फेसबुक वर आपले… “हिंदी गानेको माय मराठी मे ऐकीये”….असे पेज सुरू करून लोकांचे मनोरंजन करणारे व आपले लाळके…. गन्या अन जानराव उर्फ जुग्नु!
यांच्या भेटीला खास बॉम्बेहून आले आहे नदीम भाऊ….!
- टाया वाजवा…..
- हा तर आता नदीम भाऊ आपल्या गन्या अन् जुग्नू ची परीक्षा घेतील!
- हा तो गनु भाऊ ..जुग्नु भाऊ ….आप कौंसेभी गानेको मराठी मे हुबहु कर सकते क्या ये सही हैं…!
- बाप्पा ! सही हाय म्हनजे काय….?
- द्या ना हो कोनतही गान…!
- आमचे साळेसाशे फालोवर हायेत म्हतलं ….फेसबुक वर …!
- काही म्हनतात….. तुमचं गान ऐकल नाही त आमाले निंदच येत नाही….!
- हा..तो इससे याद आया..
- मुझे निंद ना आये…..
- ये गाने को मराठी कैसा बनावोगे?
- सोप्पं हाय….
- हा… जिग्नु तू पुळची लाईन उचलजो…
- हो…हो….हो..हा……
- मले झोप ना ये…ssss
- मले बी तसच होये….
- अरे रुको … रूको…ये कुच्छ जमा नही….!
- मंग कस पायजे त…!
- अब हम एक पुराना गाना लेते हैं…
- पंख होते तो उड आती रे.,.
- अब इसको मराठी बनावो..!
- हा… गन्या….आता मी उचलतो
- हो…..हो.,. अहो…
- फख अस्ते त उळली अस्ती रे…..
- अबे…. रुको…..
- ठीक है.. अब बताओ …मेरा पिया घर आया ओ राम जी…
- इस्को कैसा बनावोगे…?
- ये तो बहोत ही सिंपल गाना हैं….नदीम भाऊ!
- माया बुवा घरी आला….
- अवो माय बाई..!
- हे गान धूम करीन… पायजा तुम्ही….तुम्ही या गाण्यासाठी पुरस्कार देसान…अस मायावाल मन म्हणते भाऊ…..?
- अब मेरे ख्याल मे आया गलत जगा आ गया मैं..!
- तुम दोनो पुरस्कार देने के लायक नही….!
- वो मराठी मे जुते पडने को क्या कहते हैं..?
- खेटर खाने…!
- हां.. सही बोला! तुम उसके लायक हो…चलो निकलो..!
- चल गन्या …ह्याले हिऱ्याची पारख दिसत नाही…
- सुनिल ढोकणे
- तुलसी नगर, मूर्तिजापूर
- 9421830710