- नसे हारण्याची नसे जिंकण्याची…
- गड्या हौस आहे मला झुंजण्याची…
- नको चेह-याचा अता चंद्र लपवू,
- तुला शपथ आहे तुझ्या चांदण्याची…
- हसे फाटकी झोपडीही सुखाने,
- हवी फक्त इच्छा तिथे नांदण्याची…
- प्रवासी धुरंधर खरा तोच आहे,
- खरी वेळ ज्याला कळे थांबण्याची…
- किती आज नाती दुभंगून गेली,
- लिहू गझल आता मने सांधण्याची…
- @ संदीप वाकोडे