Skip to contentजेव्हा खरे मी घेतले बोलायला…
तत्वास जो प्राणापरी जोपासतो ,
घेऊ नका त्याला तुम्ही तोलायला…
धर्मांधतेची वाजली पुंगी जशी,
बघ माणसे ही लागली डोलायला…
गुंते मनाचे एवढे किचकट कसे,
जमले न ते कोणासही खोलायला…
थोड्या क्षणांची लाभली संगत सखे,
कारण पुरे आजन्म आंदोलायला…
Post Views: 48
Like this:
Like Loading...