२५ डिसेंबर सर्व ख्रिश्चन बांधव हा दिवस ख्रिसमस म्हणून साजरा करतात.ज्याप्रमाणे हिंदू बांधव दिवाळीला आपले घर सजवतात.मुस्लिम बांधव ईदला घर सजवतात.बौद्ध मंडळी १४ एप्रिलला घर सजवतात.तसेच ख्रिश्चन बांधवही या दिवशी घर सजवतात. या दिवसासाठी अगदी घराला रंग देण्यापासून तर फटाके फोडण्यापर्यंत लोकं मजल मारतात.हा दिवस हा येशूचा मृत्यू दिवस जरी असला तरी ते मृत्यूलाच पवित्र मानून हा दिवस साजरा करतात.तर जाणून घेवूया प्रभू येशूंविषयी………
- प्रभू येशू कोण होते?
प्रभू येशूबाबत सांगायचं झाल्यास प्रभू येशू हा देवाचा पुत्र आहे असं ते मानतात आणि इश्वराबाबत सांगायचं झाल्यास त्यांचा ईश्वर हा कधीच जन्म घेत नसून तो पृथ्वीवर जन्म घेण्यासाठी आपल्या पुत्रांना पाठवतो असे ते मानतात.प्रभू येशूला देव मानण्याचे कारणही ते सांगतात की प्रत्यक्ष परमेश्वर जरी या पृथ्वी वर जन्म घेत नसला तरी प्रभू येशू हा देवाचा पुत्र आहे.तो जन्म घेतो.या प्रभू येशूवर परमेश्वराचे प्रेम आहे.जर आपण प्रभू येशूंवर प्रेम केले,तर आपल्यावर प्रत्यक्ष परमेश्वराची कृपादृष्टी होते.कारण प्रत्येक माणूस किंवा कोणताही प्राणी हा आपल्या पुत्रावर प्रेम करतो.पुत्रासाठी आई आपलं जीवन सुद्धा संपवू शकते.जसे विंचवाच्या मादीला माहित असते की मी मुलांना जन्म दिल्यानंतर मला माझी मुले खाणारच आहेत.तरीही ती बाळाला जन्म देते.विंचवाच्या प्रजातीत विंचवाचा जन्म झाल्यावर सर्वप्रथम ती जन्म घेणारी बाळं आपल्या आईलाच ठार करतात व तिच्या अवयवाचे तुकडे खात असतात.
- प्रभू येशूंचा जन्म घेण्यामागील कारण
प्रभू येशूनं जन्म घेतला.याचं कारणही ते सांगतात की त्यावेळी धर्माचे स्तोम माजले होते.प्रत्येकजण पशूसारखा वागत होता.त्यांच्यामध्ये शैतान शिरला होता.असा शैतान की ज्याला थांबवीणे भाग होते.त्या शैतानाला कोणालाही रोखता येत नव्हते.म्हणून देव प्रत्यक्ष जन्म घेत नसल्यामुळे त्यांनी ह्या शैतांनाला रोखण्यासाठी आपल्या स्वतःचा पुत्र पाठवला.
- प्रभू येशूच्या जन्मावेळची परिस्थिती
येशूचा ज्यावेळी जन्म झाला.त्यावेळी त्याची आई मरीयमचा विवाह ठरला होता.ते विवाह करणारच होते.पण त्यांना अशावेळी संकट आलं.ते संकट पार पाडत असतांना अचानक मरीयम गर्भवती राहिली.त्यातच ते ज्या ठिकाणी राहात होते.त्या ठिकाणाच्या राजाच्या फतव्यामुळे प्रभू येशूचे मायबाप हे आपल्या जन्मगावी निघाले.जन्माचा दाखला आणण्यासाठी.त्यानंतर ते विवाह करणार होते.
अचानक एके ठिकाणी प्रसूतवेळी मरीयमला प्रसूतकळा आल्या व तिच्या एका गव्हाणीत एका गोंडस बाळाला जन्म दिला.त्यानंतर आकाशवाणी झाली.त्या आकाशवाणी नुसार त्या जन्मस्थळाच्या काही अंतरावर काही मेंढपाळ मेंढ्या चारत होते.त्या मेंढपाळांनी ती आकाशवाणी ऐकली.त्यात सांगीतलं होतं की परमेश्वरानं प्रत्यक्ष आपल्या मुलाला पृथ्वीवर जन्म घेवून पाठवलं आहे.त्याचा जन्म एका गव्हाणीत झाला आहे.तुम्ही त्याला पाहून घ्या.
- प्रभू येशूचा जन्म झाल्यानंतरची परिस्थिती
प्रभू येशूचा जन्म झाल्यानंतर मरीयमनं त्याला त्या गव्हाच्या गव्हाणीत गुंडाळून ठेवलं व ते पतीपत्नी पुढे निघाले.मेंढपाळांनी सांगीतल्यानुसार हा देवाचा पुत्र असल्यानं देवच याचं रक्षण करेल असं तिला वाटलं.पुढे त्याला शैतानानं खुप त्रास दिला.त्यासाठी तो गावोगावी फिरला.त्यानंतर बातिस्मा झाला व प्रभू येशूनं आपलं सेवाकार्य सुरु केलं.
- प्रभा येशूची मृत्यूवेळची परिस्थिती
बातिस्मा झाल्यानंतर प्रभू येशूनं समाजकार्य सुरु केलं.त्यांनी जगाला ख-या देवाचा सिद्धांत दिला.देव कोण आहे? तो कुठे राहतो?तो काय करतो काय नाही.इत्यादी गोष्टी त्यांनी लोकांना सांगीतल्या.त्यानुसार काही लोकं येशूचे अनुयायी बनले.पण काही लोकं येशूला जसे मानत होते.त्याचप्रमाणे काही लोकं त्यांचे विरोधकही होते.ते त्यांना तिरापाण्याप्रमाणे पाहात असत.त्यांच्यावर आरोप प्रत्यारोप करीत असत.त्यामुळं की काय त्याच लोकांनी येशूला पकडलं.त्यांना साखळदंडानं जखडलं.त्यानंतर त्यांच्यासाठी क्रुस बनवला गेला.तो क्रुस त्यांच्या खांद्यावर ठेवून तो वाहात न्यायला लावला.त्यातच ज्या दिवशी त्याला क्रुसावर चढविण्यात आले.त्या दिवशी त्याची खांद्यावर क्रुस घेवून वाहात नेतांना मिळवणूक काढण्यात आली.पुर्ण शहर फिरवून झाल्यावर त्याला क्रुसावर चढविण्यात आले अर्थात एका लाकडी खांबाला लटकावून हाताला व पायाला जीवंतपणी खिळे ठोकण्यात आले.त्याचबरोबर जे गुन्हेगार होते.त्या दोन लोकांनाही खिळे ठोकण्यात आले.नंतर तो खांब जमीनीत गाडण्यात आला व त्यानंतर ती मंडळी निघून गेली.
क्रुसावर खिळे ठोकणारी मंडळी निघून जाताच काही अनुयायी त्याच्याजवळ आले.त्यावेळी येशू म्हणाले की माझ्या मृत देहाला जाळू नका वा विल्हेवाट लावू नका.मी तीन दिवसानं पुन्हा जीवंत होणार आहे.त्यानंतर मी स्वर्गात जाणार आहे.मात्र एक की मी स्वर्गात गेल्यानंतर परमेश्वराला म्हणजेच माझ्या बापाला म्हणणार आहे की बाबा यांना माफ कर.यांनी काय केलं ते यांना माहित नाही.मी प्रत्यक्ष माझ्या बापाला यांच्या पापाची अर्थात वाईट कृत्याची क्षमा मागणार आहे.त्यानंतर मी काही दिवस बापाजवळ राहणार आहे.मग काही दिवसानंतर मी पुन्हा या पृथ्वीवर परत येणार आहे.
येशू मरण पावल्यानंतर त्याच्या प्रेताला जाळलं नाही वा त्याच्या देहाची विल्हेवाट लावली नाही.त्यानंतर त्याला एका कबरीत ठेवण्यात आले.असं म्हणतात की तीन दिवसानंतर पुन्हा येशू जीवंत झाला व तो येशू तीन दिवसानं स्वर्गात गेला.त्यावेळी तो म्हणाला होता की मी पुन्हा परत येईल.
आजही ख्रिश्ती बांधव येशूच्या म्हणण्यानुसार आजही प्रभू येण्याची वाट पाहतात नव्हे तर त्यांच्या स्वागतासाठी दरवर्षी पंचवीस डिसेंबर हा दिवस ख्रिसमस डे म्हणून साजरा करतात.
- प्रभू येशू बाबतीत आजची परिस्थिती
आज प्रभू येशू नाहीत.आज येशूला मृत होवून कित्येक वर्ष झालीत.अजूनही ख्रिश्त बांधव त्याच्या येण्याची वाट पाहात आहेत.ते हा सण मोठ्या धुमधडाक्यात साजरा करीत आहेत.पण असे असले तरी दया आणि सामोपचाराचा असलेला हा धर्म आपल्या धर्माचा प्रसार करतांना औदार्य दाखवत नाहीत.
धर्माचा प्रसार हा सामोपचाराने न करता धर्मप्रचारासाठी ते जोरजबरदस्तीही करतात कधीकधी.गोव्यामध्ये आजही अस्तित्वात असलेला हातकातरी खांब अशाच प्रकारच्या ख्रिश्चन धर्मीयांच्या बळजबरीच्या धर्मप्रसाराचे जीवंत उदाहरण आहे.आज ही धर्मप्रसार करतांना ख्रिश्चन बांधव लालसेचा आधार घेतात.नव्हे तर आमीषही देतात.
महत्वाचं म्हणजे येशूनं प्रभूप्राप्तीचा मार्ग हा सकारात्मक सांगीतला.धर्मप्रसारासाठी बळजबरी सांगीतलेली नाही.तसेच सर्वावर प्रेम करा हेही सांगीतले.एवढेच नाही तर प्रेमाच्या बाबतीत सांगतांना येशू शत्रूवरही प्रेम करायला लावतात.आम्ही मात्र तसे करीत नाही.शत्रूच का,,पण आमच्या मित्रांवरही प्रेम करीत नाही.क्रुसावर खिळे ठोकणा-या लोकांना येशूनं म्हटलं,’देवा हे काय करीत आहेत.ते माहित नाही.तू त्यांच्या हातून होणा–या पापाबद्दल त्यांना क्षमा कर.’ किती चांगले तत्वज्ञान सांगीतले येशूने.पण ह्याच धर्मातील लोकं दोन पंथाचे आहेत.कैथालिक आणि प्राटेस्टंट.कोणी येशूला मानणारे,कोोणी बातिस्मा देणा-याला मानणारे तर कोणी जिनं जन्म दिला,त्या मरीयमला मानणारे.कोणी म्हणतात की बातिस्मा झालाच नसता तर येशूनं समृद्धीचा मार्ग कसा सांगीतला असता.कोणी म्हणतात मरीयमच नसती तर येशूचा जन्म कसा झाला असता.सर्व मते मतांतरे आहेत.पण हे जरी असलं तरी लोकांनी लक्षात ठेवावं की धर्माधर्मात तेढ पसरणार नाही.तसेच सर्व धर्म शांतता प्रसवीत असून धर्मप्रसारासाठी कोणावरही बळजबरी करु नये.
- अंकुश शिंगाडे
- नागपूर
- ९३७३३५९४५०