विषमतेचा भयंकर विषारी अंधःकार नष्ट करून समतेवर आधारीत शोषणमुक्त समाज निर्मितीसाठी शिक्षण हेच सर्वात प्रभावी अस्त्र असल्याचे महात्मा ज्योतिबा फुले यांनी निर्धारपूर्वक ठरविले. अतिशय भिषण स्थितीमध्ये स्वतःच्या कृतितून प्रत्येक अन्यायकारक परिस्थितीवर मात करण्याचा निर्णय निर्भयपणे घेतला. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी या ज्ञानप्रकाशाच्या कार्यात स्वतःला पूर्णपणे झोकून दिले. समाजाला छळ,रोष,विरोध पत्करला आणि हजारो वर्षाच्या गुलामीला नष्ट करण्यासाठी चंग बांधला आणि तडीस नेला.आणि म्हणूनच आज स्त्रियां पुरुषांच्या बरोबरीने अनेक क्षेत्रात नेतृदिपक भव्य दिव्य कार्य करित आहेत.आजही अंधःश्रद्धा, जातीयता,हुंडाप्रथा, कुटूंबातील महिलांचे दुय्यम स्थान, महिलांवरील अत्याचार गांभीर्याने लक्षात घेवून क्रांतीज्योती सावित्रिबाई यांचे आदर्श डोळयांसमोर ठेवून दृढ संकल्प करून नियोजनबद्धरित्या विधायक मार्गाने संघर्ष करण्याची नितांत आवश्यकता आहे. हीच सावित्रीबाई फुले यांना खरी आदरांजली ठरेल.
*श्रीपतभाऊ आणि जयश्रीताई,*
*मनिष नगर, नागपूर.*