अमरावती : मुदिता बहुउद्देशीय महिला मंडळ, विश्वशांती नगर, शेगाव रहाटगाव रोड अमरावती अंतर्गत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाला नगरसेविका वंदना मडगे, डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) चे प्रकल्प अधिकारी विजय वानखडे, गौरव अवचट, संभव इंगोले, राखी सोलव, शितल निंभोरकर, स्मिता मोरे, उषा मेश्राम, सागर जाखोटीया, मुदिता बहुउद्देशीय मंडळाच्या सर्व सदस्य व परिसरातील नागरीक उपस्थित होते.
अध्यक्ष मिराताई मोंढे व तसेच उपस्थित पाहुण्यांनी महापुरुषांच्या प्रतिमेचे पुजन करुन समयोचित भाषणे केली. सावित्रीबाई फुलेंची भुमिकेत वर्षा इंगळे व निता वाघमारे यांनी भुषविले तसेच मी सावित्री बोलतेय ची भुमिका आयुषी पाटील हिने केली.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन सावित्रीबाई फुले नारीरत्न पुरस्कार प्राप्त गुंफाताई वाघमारे यांनी केले तर आभार स्वाती खंडारे यांनी मानले. हे भारत देशा या क्रांती गिताने कार्यक्रमाची सांगता झाली.
Related Stories
September 8, 2024
September 5, 2024