Poem क्रांतिसूर्य महात्मा फुले बंडूकुमार धवणे, संपादक November 27, 2021 1 min readShare this:FacebookX WhatsApp Group Join Now Telegram Group Join Now दि.२८ नोव्हेंबर,२०२१ ला “क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले” यांच्या स्मृतिदिनानिमित्त कवी प्रा.अरुण बा. बुंदेले यांची “क्रांतिसूर्य महात्मा फुले” ही अभंगरचना वाचकांसाठी येथे प्रकाशित करीत आहोत.- संपादक —————————————– क्रांतिसूर्य तत्त्व । सत्यधर्म खाण। जगात सन्मान। सत्याचाच॥१॥ महात्मा फुलेंचा। शिक्षण विचार। जीवन आधार। आयुष्याचा॥२॥ संसाराचा घात । मद्य सेवनाने। ग्रंथ वाचनाने। सुख शांती॥३॥ आदर्श शिक्षक । घडवून फुले। मन घडविले। विद्यार्थ्यांचे॥४॥ आदर्श गुरुंचे। फुले तत्त्वज्ञान। शिक्षक जीवन। सन्मानित ॥५॥ महात्मा फुलेंचे। विचार महान। घडविले जन। भारतात ॥६॥ विद्येचे अमृत। बहुजना दिले। तयांना तारले। जीवनात॥७॥ शिक्षणाचा झेंडा। घेऊनिया हाती। करीत जगृती। समाजाची॥८॥ करुनी अर्पण। तन मन धन। समाजाचे मन । घडविले॥९॥ महात्मा फुलेंचा। आज स्मृतिदिन। करांनी वंदन । कोटी कोटी॥१०॥ – प्रा.अरुण बाबारावजी बुंदेले, रुक्मिणी नगर,अमरावती ४४४६०६ (महाराष्ट्र). भ्र.ध्व.:-८०८७७४८६०९. Email ID : arunbundele1@gmail.comLike this:Like Loading... Continue ReadingPrevious: वचनNext: खरे तेच खरे Related Stories कैफियत 1 min read Poem कैफियत September 8, 2024 आंबेडकर आणि गांधी 1 min read Poem आंबेडकर आणि गांधी September 5, 2024 बळी राजाचा सोबती 1 min read Poem बळी राजाचा सोबती September 2, 2024