प्रत्येक महाविद्यालय स्तरावर एक राष्ट्रीय सेवा योजना पथक विद्यापीठाद्वारे प्रदान केलेले आहे. व या पथकाने द्वारा नियमित कार्यक्रमांमध्ये थोर पुरुषांच्या जयंती ,पुण्यतिथी ,विविध विशेष दिन, विविध खेड्यांमधील विविध विशेष शिबिरे, वृक्षारोपण व संवर्धन कार्यक्रम, स्वच्छता अभियान, रक्तदान शिबिरे, शेतकरी मार्गदर्शन कार्यक्रम, दरवर्षी राबविले जातात. परंतु मागील वर्षी पासुन कोविड १९ चे प्रादुर्भावामुळे विद्यार्थी आपल्या गावामध्ये ऑनलाइन प्रणाली द्वारा शिक्षण घेत आहे.
महाराष्ट्र शासनाचे राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे निर्देशानुसार कोवि ड १९ चे काळात विद्यार्थ्यांनी विविध विद्यापीठे व महाविद्यालय द्वारा आयोजित कोरोना जनजागृती संदर्भातील विविध आभासी चर्चासत्रांमध्ये सहभाग घेऊन आवश्यक ते ज्ञान अर्जित केले व आपल्या परिसरातील व गावातील नागरिकांची धोरणाबद्दल वेळोवेळी जनजागृती केली. यावेळी त्यांनी ऑनलाइन व्हिडिओ ,पथनाट्य यांचे माध्यमातून जनतेला मास्क चां वापर करणे ,हात साबणाने वेळोवेळी स्वच्छ धुणे, व सहा फुटाचे फिजिकल अंतर ठेवणे, याबद्दल माहिती प्रदान केली. महाराष्ट्र शासन व युनिसेफ यांचेमार्फत प्राप्त भित्तीपत्रके व माहिती पत्रकांचे वाटप केले. वेळोवेळी डॉक्टर नर्स व विविध कोवि ड योध्याना मदत केली.
त्याचप्रमाणे स्वच्छता अभियान, रक्तदान शिबिरांचे आयोजन व सहभाग ,ग्रामपंचायत व प्राथमिक आरोग्य केंद्र यांचे निर्जंतुकीकरण कार्यक्रम, लॉकडाउन कालावधीत गरजूंना कपडे ,धान्य ,व किराणा वाटप, ग्रामस्थांना मास्कचे वाटप, रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आवश्यक.आहाराची माहिती, इत्यादी विविध उपक्रम राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवकांनी राबविले. तसेच पूर्णा लसीकरण ऑनलाइन माहिती ग्रामस्थांना भरून घेऊन त्यांना लसीकरणाचे महत्त्व समजावून सांगितले. प्रत्येक नागरिकाने स्वतःची व आपल्या परिवाराची कॉरोना बद्दल antigen व RTPCR टेस्ट करून घेण्याबाबत जनजागृती केली. लसीकरण कालावधीत प्राथमिक आरोग्य केंद्रावर आलेल्या रुग्णांची तापमान तपासणी, त्यांचे निर्जंतुकीकरण, सहा फुटाचे अंतर ठेवण्याची प्रक्रिया, या सर्व बाबींमध्ये राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवकांनी सहभाग नोंदविला. लसीचे दोन डोस घेतल्यानंतर सुद्धा गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळणे, मास्कचा वेळोवेळी वापर करणे. वेळोवेळी हात स्वच्छ धुणे या पद्धतींचा अवलंब करण्याचे ते सर्वांना आवाहन करीत आहे.
अशाप्रकारे राष्ट्रसेवा व सामाजिक बांधिलकी जपणार्या राष्ट्रीय सेवा योजनेचे ब्रीदवाक्य”NOT ME BUT YOU” हे सार्थक ठरविताना सर्व राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक आढळून येत आहे. व सर्व संकटाचे काळात आम्ही समाजाच्या सोबत आहोत असा निर्धार ते व्यक्त करीत आहे.
– प्रा.दीपक .पा. बोंदरे.
कार्यक्रम अधिकारी
राष्ट्रीय सेवा योजना
श्री संत शंकर महाराज कृषी महाविद्यालय,
पिंपळखुटा, तालुका धामणगाव रेल्वे, जिल्हा अमरावती.