अमरावती : जिल्ह्यात ज्येष्ठांसाठी कोरोना प्रतिबंधक लसीकरण होत असून, लसीकरण केंद्रांची संख्या वाढविण्यात आली आहे. महापालिका क्षेत्रातील सहा नव्या केंद्रांसह जिल्हा रूग्णालयाच्या ज्येष्ठ नागरिक वॉर्डातही नवे केंद्र सुरु करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी या केंद्राची पाहणी करून लसीकरणाला वेग देण्याचे निर्देश दिले. जिल्हा रूग्णालयाच्या नसिर्ंग स्कूलमध्ये दोन व आता ज्येष्ठ नागरिक वॉर्डात एक अशी ३ केंद्रे कार्यान्वित करण्यात आल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम यांनी सांगितले. महापालिकेतर्फे डॉ.पंजाबराव देशमुख महाविद्यालय व दंतचिकित्सा महा विद्यालयापाठोपाठ आणखी सहा केंद्रे वाढविण्यात आली. त्याशिवाय, शहरातील मुरके हॉस्पिटल, चौधरी रूग्णालय, सुझान कॅन्सर हॉस्पिटल, हायटेक रूग्णालय, मातृछाया रूग्णालय, अच्युत महाराज रूग्णालय या खासगी रूग्णालयांतही लसीकरण केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. त्याशिवाय, प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी ग्रामीण रूग्णालयांत लसीकरण केंद्रे सुरू करण्यात आल्याचे जिल्हाधिका-यांनी सांगितले.
Contents
hide
Related Stories
December 8, 2024
December 8, 2024