वर्धा :वर्धा जिल्हा पोलीस दलातील सहायक फौजदार श्री विजय आंबटकर नेमणूक पोलीस मुख्यालय, वर्धा यांचे कोरोना या आजाराने १८ डिसेंबर २0२0 रोजी दुखद निधन झाले होते. कोरोना आजाराने कर्तव्यावर हजर असतांना एखादया अधिकारी/कर्मचारी यांचा मृत्यु झाल्यास त्यांचे वारसास पन्नास लाख रुपये सानुग्रह अनुदान देण्याबाबतचा शासन निर्णय आहे.
शहिद झालेल्या पोलीस कर्मचार्यांच्या वारसांना त्यांचे अडीअडचणीचे काळात आर्थिक मदतीचा हातभार लागावा या अनुषंगाने पोलीस अधीक्षक श्री प्रशांत होळकर यांनी पोलीस महासंचालक कार्यालयाशी समन्वय साधुन शहिद झालेल्या कर्मचारी यांच्या वारसांना सानुग्रह अनुदान मिळवुन देण्याकरीता प्रयत्न केले.
सदर शासन निर्णयाचे अनुषंगाने कोरोना कर्तव्यकाळात कर्तव्य बजावित असतांना कोरोना विषाणूची लागन होवून शहिद झालेले सहायक फौजदार श्री विजय आंबटकर यांची पत्नी मेघा विजय आंबटकर यांना पन्नास लाख रुपये रकमेचा धनादेश आज दि. २६ मार्च २0२१ रोजी पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर यांचे हस्ते प्रदान करण्यात आला. सदर वेळी पोलीस अधीक्षक होळकर साहेब यांनी शहिद कर्मचारी यांची पत्नी यांना भविष्यात आपणास कुठल्याही प्रकारची अडचण आल्यास मदत करण्याचे आश्वासन दिले.
तसेच पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत बागडी यांची देय असलेली उर्वरित रक्कम १0 लाख रुपये सुद्धा यावेळी त्यांचे वारसास देण्यात आली. सदर धनादेश वितरण कार्यक्रमाचे वेळी प्रभारी पोलीस उपअधीक्षक (गृह) श्री खांडेकर, पोलीस निरीक्षक श्री निलेश ब्राम्हणे, सपोनि. महेंद्र इंगळे हे हजर होते.
Related Stories
September 17, 2024
September 14, 2024