जिनेव्हा : कोरोनाचा विषाणूचा उगमस्रोत आणि त्याच्या संसर्गाबाबत चौकशी करणार्या जागतिक आरोग्य संघटनेच्या तज्ज्ञांनी मोठा खुलासा केला आहे. वुहानच्या शहरातून हा संसर्ग जगभरात पसरला असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेच्या पथकाने केलेल्या चौकशीतून समोर आले आहे. कोरोनाचा संसर्ग वटवाघळांच्या माध्यमातून माणसांना झाला असल्याचे म्हटले आहे. मात्र, चौकशी पथकाला याबाबतचे वेगळेच संकेत मिळाले आहेत.
वुहान शहरातील प्राण्यांच्या बाजारात विक्री होणार्या ससे आणि उंदरांच्या काही प्रजातीतून कोरोनाचा विषाणू माणसांमध्ये फैलावला असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले. वॉल स्ट्रीट र्जनलने या चौकशी पथकातील तज्ज्ञांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, जगभरात कोरोनाचा फैलाव या प्राण्यांमधून फैलावत आहे.
याबाबतची परिस्थिती स्पष्ट करण्यासाठी प्राण्यांच्या बाजारात पुरवठादारांची चौकशी करण्याची आवश्यकता आहे. या बाजारात वैध अथवा अवैध मार्गाने किती मृत आणि जिवंत प्राण्यांची विक्री केली याची चौकशीही करणे आवश्यक आहे.
युरोपमध्ये कोरोनाबाधितांची संख्या वाढल्यानंतर चीनने मोठ्या प्रमाणावर चाचणी सुरू केली होती, अशी माहितीही तज्ज्ञाने दिली. मागील आठवड्यातच जागतिक आरोग्य संघटनेचे चौकशी पथक चीनमधून परतले आहे. चीनच्या प्रयोगशाळेतून कोरोनाचा संसर्ग फैलावला नसल्याचेही या पथकाने म्हटले होते.
वुहानच्या मांस बाजारातून कोरोनाचा फैलाव झाला, याबाबत ठोस सांगता येणार नसल्याचे या पथकातील तज्ज्ञाने सांगितले. सुरुवातीच्या रिपोर्टनुसार, वटवाघळांच्या माध्यमातून कोरोनाचा फैलाव झाला असे म्हटले जाते.
मात्र, त्याचा कोणताही पुरावा अथवा संकेत मिळाले नसल्याचे तज्ज्ञांनी स्पष्ट केले. कोणत्या तरी एका प्राण्याच्या माध्यमातून वटवाघळांमध्ये कोरोनाचा विषाणू गेला असावा आणि तेथून संसर्ग फैलावला असू शकतो. अशीही शक्यता वर्तवण्यात येत होती.
Related Stories
September 14, 2024
September 8, 2024