मुंबई : कोरोना विरोधात लढण्यासाठी आतातरी आपल्याकडे मास्क हेच एकमेव आयुध आहे. तसेच, हात धुणे व अंतर ठेवणे हे देखील महत्वाचे आहे. कारण, वॅक्सीनचा अजूनही काहीच पत्ता नाही. राज्यात कोरोनाचा धोका अजूनही कायम आहे, अजूनही आपल्याला बंधनांची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. कोविड योद्धा म्हणून इलेक्ट्रानिक मीडियामधील पत्रकारांच्या सन्मान सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते.
लॉकडाऊन सुरू होण्या अगोदरपासून मी केंद्र सरकारशी स्थलांतरीत मजुरांबाबत बोलत होतो. त्यांच्यासाठी विशेष रेल्वेची मागणी केली जात होती. परंतु तेव्हा केंद्रकडून तयारी दर्शवली गेली नाही. परंतु, ज्या काळात त्यांना जाऊ दिले पाहिजे होते, तेव्हा आपण त्यांना थांबवलं व जेव्हा जाऊ द्यायला नको होते, तेव्हा आपण त्यांना जाऊ दिले, कारण तेव्हा पर्यायच उरलेला नव्हता. मग हे मजूर सर्व ठिकाणी पसरायला लागले. शेवटी त्यांना आहे तिथेच थांबण्यासाठी ठिकठिकाणी छावण्या काढव्या लागल्या. सहा ते सात लाख मजुरांना किमान एक महिना तरी आपण सर्व प्रकारची सुविधा देण्याचा प्रयत्न केला, असे मुख्यमंत्री म्हणाले.
Related Stories
October 10, 2024