अमरावती : जिल्हयात कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची पुन्हा उच्चांक गाठला असून एकाच दिवसात ३१५ कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले आहेत. परिणामी जिल्हयात आतापर्यत २४ हजार १५0 कोरोनाग्रस्तांची नोंद करण्यात आली आहे. मृतांच्या आकडयामध्ये दिवसागणीक वाढ होत असून आतापर्यत ४२८ रूग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचे निदश्रेनास आले आहे. एक हजार च्या जवळपास रूग्णांवर कोविड हॉस्पीटल तसेच क्वारंटाईन सेटर येथे उपचार सुरू असून २२ हजार पेक्षा जास्त रूग्णांना रूग्णालयातुन डिस्चार्ज देण्यात आला आहे.
जिल्हयात सातत्याने वाढत असलेल्या कोरोना पॉझिटिव्ह रूग्णामुळे प्रशासनाने सक्तीचे पाऊल उचलने सुरू केले असून मास्क न लावणार्यावर दंडात्मक कारवाईसह गुन्हे दाखल करण्याचे आदेश देखिल जिल्हाधिकारी यांनी दिले आहे. जिल्हयात मागिल ११ दिवसापासुन कोरोनाबाधित रूग्णांची संख्या ही झपाटयाने वाढत असल्यामुंळे नागरिकांचा बेजबाबदापणा यास कारणीभुत असल्याचे दिसून येत आहे. भयावह परिस्थीती निर्माण झाली असतांना देखिल बाजारपेठ तसेच इतर ठिकाणी असंख्य नागरीक हे विना मास्क आढळुन येत असल्याचे वास्तवदश्री चित्र पहावयास मिळत आहे.त्यामुळे बाधित रूग्णांपासुन मोठयाप्रमाणात संसर्ग वाढत असून परिणामी रूग्णांच्या संख्येत देखिल मोठया प्रमाणात वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. महत्वाचे म्हणजे कोरोना लस दिल्यानंतर देखिल पुन्हा नागरिकांना कोरोनाची लागन होत असल्यामुळे जनसामान्यामध्ये भितीचे वातावरण पहावयास मिळत आहे. मात्र तज्ञ डॉक्टरांनी या संदर्भात स्पष्टीकरण देतांना एकदा लस दिल्यानंतर त्या लसीचा योग्य परिणाम होण्यास १५ ते २0 दिवसांचा कालावधी लागतो दरम्यान २८ दिवसानंतर पुन्हा दुसरी लस घेतल्यानंतर योग्य परिणाम दिसून येतो असेही डॉक्टरांनी सांगितले आहे. रूग्णांची संख्या ही सातत्याने वाढत असल्याने प्रशासनाकडून अनेक क्वारंटाईन सेंटर हे सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ११ फेब्रुवारी रोजी जिल्हा आरोग्य विभागाकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्हयात ३१५ कोरोना बाधित रूग्णांची नोंद करण्यात आली असून २४ हजार १५0 रूग्ण हे आतापर्यत कोरोनाग्रस्त आढळून आले आहेत.४२८ रूग्णांचा आतापर्यत मृत्यू झाला असून २२ हजार पेक्षा जास्त रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
Related Stories
October 10, 2024
October 9, 2024