- एका पाठोपाठ आल्या
- अमृताच्या चंद्रसरी
- अशी रात ग कोणती
- शरदाची कोजागरी॥धृ॥
- आल्या सार्या चंद्रसरी
- पहा माझ्या धरेवरी
- घरा-दारात अंगणी
- माझ्या नाचल्या ओसरी॥१॥
- केशराच्या दूग्धावरी
- सार्या नाहल्या सुंदरी
- सार्या नाहल्या सुंदरी
- जलकुंभ स्नानापरी॥२॥
- मला भासल्या नाचल्या
- चंद्रसरी दुग्धपरी
- हासू चांदीचं हासल्या
- औतरल्या भुवरी॥३॥
- हासू पाहून पाहिली
- खुशी वसुधा अधरी
- हासू चांदीचं हासली
- माझी वसुधा सुंदरी॥४॥
- चंद्रसरीत भिजली
- चिंब माझी शब्दसरी
- आली स्वागता धरेच्या
- कोजागरी च्या औसरी॥५॥
- -निसर्गसखी सौ.मंगला मधुकर रोकडे*
- “शब्दसृष्टी”, मास्तरवाडी,नेहरु नगर,
- देवपूर, धुळे.
- दूरध्वनी क्र. ९३७१९०२३०३.
- [मांगल्याचा झरा प्रकाशित कविता संग्रहामधून. …]
—–