- घात झाला देवा आता
- झाली सारी वाताहात
- तुह्या निसर्गाच्या म्होरं
- झाले हतबल हात !!
- अरे आभायीच्या देवा
- असा कसा तू कोपला
- मासभरा पासून रे
- सूर्य देव तू झाकला !!
- धोधो पावसाचा देवा
- कैसा माजला कहर
- ऊभ्या धरतीचा देवा
- कैसा केला समींदर !!
- रान डूबल डूबल
- पिकं गेलं रे पाण्यात
- कृष्णामाई पूर्णामाय
- कशी धावते रानांत !!
- पशु पक्षी जीव देवा
- सारे झाले सैरभैर
- चोचभर दाण्यासाठी
- भिर भिरती पाखरं !!
- बळीराजा कासावीस
- पोटी ऊपाशी झोपला
- दया मायेचा रे झरा
- तुहा कसा रे आटला !!
- नाही राजाची रे साथ
- निसर्गानं केला घात
- सांग माह्या दैवाची रे
- कुठं मांडू मी कैफत
- वासुदेव महादेवराव खोपडे
- सहा पोलीस उपनिरीक्षक(सेवानिवृत्त)
- अकोला 9923488556