- * माहितगारांना उपस्थित राहण्याचे आवाहन
अमरावती : अमरावती मध्यवर्ती कारागृहातील दोन कैद्यांच्या मृत्यूप्रकरणी उपविभागीय दंडाधिका-यांकडून चौकशी होत असून, माहितगारांनी वस्तुस्थितीदर्शक माहिती 25 जानेवारीपर्यंत समक्ष सादर करण्याचे आवाहन अमरावतीचे उपविभागीय अधिकारी उदयसिंह राजपूत यांनी केले आहे.
याबाबत तपशील असा की, अमरावती मध्यवर्ती कारागृहातील शिक्षा बंदी बाळकृष्ण कोंडू बाईत (वय 63), रा. एम. एस. पाटीलवाडी, ब्रम्हदेव मंदिराजवळ, साई सिद्धी चाळ, रुम क्र. 136, चेंबूर(ई), मुंबई- 71 यांचा दि. 31 ऑगस्ट 2021 रोजी अमरावतीच्या जिल्हा सामान्य रूग्णालयात दुपारी 1.25 वाजता मृत्यू झाला.
त्याचप्रमाणे, अमरावती मध्यवर्ती कारागृहातील न्यायबंदी प्रदीप श्रीराम वानखडे (वय 30) रा. पूर्णानगर, ता. भातकुली, जि. अमरावती यांचा दि. 5 ऑगस्ट 2021 रोजी दुपारी 13.15 वाजता अमरावतीच्या जिल्हा सामान्य रूग्णालयात मृत्यू झाला.
चौकशीत कैदी मयत होण्याचे कारण, मृत्यूपूर्वी कैद्याचे स्वास्थ्य कसे होते, कैद्याला मारामारी होऊन त्यामध्ये मृत्यू झाला किंवा कसे, पोलीसांना कोणती भूमिका बजावली, वैद्यकीय उपचाराची कागदपत्रे व व्हिसेरा अहवाल आदी बाबी तपासण्यात येणार आहेत. माहितगारांनी वस्तुस्थितीदर्शक माहिती व आवश्यक कागदपत्रांसह आपले नाव व पत्ता सुस्पष्ट नमूद करून प्रतिज्ञापत्रे उपविभागीय अधिकारी, तहसील कार्यालय परिसर, श्याम चौक, अमरावती यांच्या कार्यालयात 25 जानेवारीपर्यंत समक्ष सादर करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.