- तुझ्यापुढे सदा
- नैवेद्याच्या राशी;
- कडक उपाशी
- भक्तीखोर.
- भक्ती-कारखाने
- गल्लोगल्ली तुझे;
- जीवघेणे ओझे
- पृथ्वीलाच.
- नवसाच्या वेळी
- कुस्करून कळी;
- ताजा, पाक बळी
- देतो आम्ही.
- देत नाहीस तू
- कधीही दर्शन;
- तन-मन-धन
- किती वाहू?
- नकली ईश्वरा
- झालास तू सुरा;
- हुकमी मोहरा
- पुजा-यांचा…!
- – मिलिंद हिवराळे
- बार्शिटाकळी, जि. अकोला
- भ्र. 7507094882
- ईमेल : milindhiwarale@yahoo.com