Skip to content
आनंदी जीवन । आम्हां नसे ठाव ।अन्नासाठी धाव । घेतो आम्ही ।।प्रकाश आम्हाला । क्वचित दिसतो ।काळोख हसतो । आम्हांवर ।।फाटके वसन । फाटके नशीब ।आहोत गरीब । संपत्तीने ।।मुलं चिमुकली । खाऊसाठी रडे ।
तेंव्हा धडधडे । मन फार ।।
धोंड्यासाठी राही । पक्वानांची ताट ।
आम्हां दावी वाट । चिखलाची ।।
देव फक्त देतो । घेत काही नाही ।
साधू,संत ग्वाही । देत गेले ।।
आम्हां नको धन । नकोच पक्वान ।
तुमच्या समान । जाणा आम्हां ।।
आमच्या वदनी । हर्ष येवो ।।
तरनोळी ता.दारव्हा,जि.यवतमाळ
Like this:
Like Loading...