अमरावती,दि.26: वाशिम जिल्ह्यातील कारंजा येथील वनविभागाच्या 250 एकर जमिनीवर निसर्ग पर्यटन केंद्राचा आराखडा विकसित करण्यात येत आहे. कारंजा निसर्ग पर्यटन केंद्राचे नामकरण ‘स्व. प्रकाशदादा डहाके निसर्ग पर्यटन केंद्र’ असे करण्यास शासनाने मंजुरी दिली आहे.
गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी ‘स्व. प्रकाशदादा डहाके निसर्ग पर्यटन केंद्रा’चा पुरवणी आराखडा तत्काळ तयार करण्याचे निर्देश दिले आहेत.या कामाचा पुरवणी आराखडा अमरावती वन विभागाचे निवृत्त सहायक वनसंरक्षक अशोक कविटकर यांनी तयार केला असून त्याबाबत त्यांनी गृहमंत्री श्री. वळसे-पाटील यांना अमरावती दौऱ्यावर असतांना सादर केला. याबाबत लवकरच कार्यवाही करण्यात यावी, अशी सूचना गृहमंत्र्यांनी यावेळी केली.
—–