तुप अन काय ती भक्ती?
उपाशी ठेऊनी मायबापा
कशी पावनार तुला शक्ती?
मूर्ख माणूस हा
देव तरी पुजतो कसा?
का पुजतो पाषाणाला?
उगाच जोराने तोडतो घसा..
हाकलुन घराबाहेर विठू माऊलीला
जातोच का तो वारीला?
नाव घेऊनी मोठ मोठ्याने
दिखावा कशाला जगा दावण्या
प्रेम भावना अन आपुलकी
कसला दिखावा भला मोठा
जहरच असते मनात त्याच्या
वरवर तो मुखवटा खोटा
फिरते माऊली खाते ठोकर
भीक मागूनी जगते रे
हात तुझे न थरथरनारे
कसा घराबाहेर काढतो रे?
तूप अन त्या दुधाने
दगडाला अभिषेक कशाला
देउन मायबापा शिळी भाकरी
नाही पावनार रे मुर्ख कर्माला..
देव मागत नाही मुर्खा
नको तुझं ते दूध अन् तूप..
सुखी ठेव त्या मायबापा
तेच तर खरे विठुचे रुप..
मिळावा देव तुला म्हणून
नकोच तो कठोर उपवास
माणुसकी जपुन बघ निस्वार्थाने
देव दिसेल तुज प्रत्येक माणसात.
– प्रतिक्षा गजानन मांडवकर
स्वप्न डोळ्यातले
यवतमाळ
8308684865