- कष्टकरी माझा बाप
- शेतकरी माझा बाप ।
- नित्य जगास पोसतो
- सेवेकरी माझा बाप ।।
- घरदार सोडूनिय
- रोज शेतात झोपतो ।
- स्वतः उपाशी राहून
- निगा पिकांची राखतो ।।
- श्वेत सोनं पिकवतो
- तरीपण स्वतः दीन ।
- माझा बाप शेतामध्ये
- जसा पाण्यामध्ये मिन ।।
- माझे दुःख विसरतो
- घाम बापाचे बघता ।
- दुःखामध्ये राहूनही
- क्षण सुखाचे टिपता ।।
- जन्मभर ऋण कसा
- कोण फेडणार त्याचे ।
- बापाविन दावणार
- कोण दिवस सुखाचे? ।।
- शब्दसखा-अजय रमेश चव्हाण,
- तरनोळी
- ता.दारव्हा, जि.यवतमाळ
- मो.८८०५८३६२०७